नागपूर, वृत्तसंस्था – अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सध्या अरुण गवळी नागपूर कारागृहात आहेत. पाच जणांना करोना संसर्गाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
दोन दिवसांपूर्वी अरुण गवळी याची प्रकृती खालावली होती. त्यामुळे गवळी याच्यासह अन्य कैद्यांची करोना चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल आज आला. यात गवळीसह पाच जणांना करोना संसर्गाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या पाचही जणांचे कारागृहात वेगवेगळ्या बॅरेकमध्ये विलगीकरण करण्यात येऊन त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्यांच्यावर वैद्यकीय तज्ज्ञांच्या निगराणीत उपचार सुरू आहेत. नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्या प्रकरणात 2012 साली गवळीसह 10 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.


