Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

कोल्हापूरात दागिने चोरण्यासाठी वूद्ध महीलेची हत्या केल्याचे निष्पन

आरोपी जेरबंद

by Divya Jalgaon Team
February 10, 2021
in गुन्हे वार्ता, राज्य
0
कोल्हापूरात दागिने चोरण्यासाठी वूद्ध महीलेची हत्या केल्याचे निष्पन

कोल्हापूरःआनिल पाटील – राजाराम तलाव इथं अर्धवट जळालेल्या स्थितीत एक मृतदेह आहे, अशी वर्दी पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता राजराम तलाव परिसरात धाव घेतली. क्षणाचाही उसंत न घेता पोलिसांनी या प्रकरणात कसून तपास केला आणि सायंकाळपर्यंत संशयिताच्या हाती बेड्या ठोकल्या. प्रथम दर्शनी तपासासाठी अत्यंत किचकट असणारा या गुन्ह्याचा तपास पोलिसांनी काही तासात लावला. या खुनाच्या गुन्ह्यात पोलिसांनी संतोष निवृत्ती परीट या ३५ वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.

संतोष हा कर्जबाजारी असून या वृद्ध महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरण्यासाठी हा खून केल्याचे निष्पन्न झालेले आहे. तर मयत महिलेचे नाव शांताबाई श्यामराव आगळे (८०, रा. जगताप कॉलनी) पाचगाव असे निष्पन्न झाले आहे.एक महिलेचा अर्धवट स्थितीत जळालेला मृतदेह मिळल्याची बातमी कोल्हापूर शहरात वाऱ्यासारखी पसरली होती. पोलिसही या गुन्ह्यामुळे चक्रावून गेले होते. या महिलेची ओळख पटवणे हे पोलिसांसमोरील सर्वांत मोठे आव्हान होते.पोलिसांनी तातडीने गेल्या काही दिवसांतील मिसिंग रेकॉर्ड तपासण्यास सुरुवात केली. त्यातून त्यांना पाचगावमधील शांताबाई आगळे बेपत्ता असल्याची तक्रार नोंद असल्याचं दिसून आलं. पोलिसांनी तातडीने त्यांच्या नातेवाईकांना बोलवून घेत मृतदेहाच्या अंगावरील कपडे इतर काही वस्तू यावरून नातेवाईकांनी शांताबाई यांचाच हा मृतदेह असल्याचं सांगितलं.यानंतर पोलिसांनी चौकशी सत्र सुरू केले.

पोलिसांना सूत्रांकडून संतोष परिट या व्यक्तीबद्दल संशयास्पद माहिती मिळाली. संतोष हा टाकाळा येथील रहिवाशी असून तो गेली ५ वर्ष शांताबाई आणि त्यांच्या नातेवाईकांना ओळखतो.पोलिसांनी संतोषला ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता त्याने या गुन्ह्याची कबुली दिली.संतोष हा कर्जबाजारी आहे. शांताबाई यांच्या अंगावर सोन्याचे दागिने असतात याची माहिती त्याला होती. ५ फेब्रुवारीला त्यांने शांतबाई यांना देवकार्य करण्याच्या बहाण्याने स्वतःच्या घरी बोलवले आणि तिथं त्यांचा खून करून त्यांच्या अंगावरील दागिने काढून घेतले.पोलिस या प्रकरणात अधिक तपास करत आहेत.

तपास पथक

पोलीस अधीक्षक डॉ.शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, उप विभागीय पोलिस अधिकारी मंगेश चव्हाण, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, राजारामपुरी पोलिस ठाणेचे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल, पोलिस निरीक्षक संदिप कोळेकर पोलिस निरीक्षक अनिल गुजर, सहा पोलिस निरीक्षक सत्यराज घुले, महिला सहा पोलिस निरीक्षक जौंजाळ, पोलिस उप निरीक्षक विवेक राळेभात, विनायक सपाटे, समाधान घुगे, पोलिस अमलदार अमित सर्जे, खराडे, सागर कांडगावे, अमोल कोळेकर, संदिप कुंभार, राम कोळी, अजय वाडेकर, सुरेश पाटील, अर्जुन बंदरे, तानाजी गुरव, फिरोज मुल्ला, तसेच आरसीपी टीम.

Share post
Tags: #KolhapurcrimeMarathi Newsकोल्हापूरात दागिने चोरण्यासाठी वूद्ध महीलेची हत्या केल्याचे निष्पन
Previous Post

ईच्छादेवी पोलीस चौकीच्या शेजारी गुटखा पकडला

Next Post

नवीन ट्रान्सफार्मर बसविण्यासाठी भाजपा तालुक्याच्यावतीने महावितरणला निवेदन

Next Post
नवीन ट्रान्सफार्मर बसविण्यासाठी भाजपा तालुक्याच्यावतीने महावितरणला निवेदन

नवीन ट्रान्सफार्मर बसविण्यासाठी भाजपा तालुक्याच्यावतीने महावितरणला निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group