मेष:-सामाजिक कार्यात पुढाकार घ्याल. कामाची दगदग वाढेल. गृहोपयोगी वस्तु खरेदी कराल. क्षणिक आनंदाचा लाभ होईल. व्यापारात चांगला लाभ संभवतो.
वृषभ:-मोठ्या लोकांच्या ओळखीचा लाभ होईल. सर्वांना आनंदाने समजून घ्याल. नवीन मित्र जोडाल. नवीन वाहन घेण्याची इच्छा मनात रूजेल. आर्थिक दर्जा सुधारेल.
मिथुन:-गैरसमजाला बळी पडू नका. कलागुणांना चांगला वाव मिळेल. मनाजोगी खरेदी करता येईल. तुमच्या कलेचे कौतुक केले जाईल. अति विचार करू नका.
कर्क:-मनाची विशालता दाखवाल. गायन, वादन कलेला चांगला प्रतिसाद मिळेल. शैक्षणिक कामात यश येईल. मनाची सहृदयता दाखवाल. चांगली कल्पनाशक्ति लाभेल.
सिंह:-अचानक धनलाभ संभवतो. वारसाहक्काची कामे करता येतील. सासुरवाडीची मदत घेता येईल. काही कामे कमी श्रमात पार पडतील. जोडीदाराची प्राप्ती वाढेल.
कन्या:-गृहशांती महत्त्वाची आहे. मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल. पित्तविकार बळावू शकतात. रेस, जुगार यातून लाभ संभवतो. मानसिक शांतता लाभेल.
तूळ:-जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी. साहित्याची आवड जोपासता येईल. घरातील कामात व्यग्र राहाल. घरातील स्वच्छता काढली जाईल. मुलांशी जुळवून घ्यावे लागेल.
वृश्चिक:-आवाक्याबाहेर खर्च वाढू शकतो. हातातील कामात यश येईल. कौटुंबिक कार्यक्रम काढले जातील. लहान प्रवासाचा आनंद घ्याल. काही कामे खिळून पडतील.
धनू:-पित्ताचा त्रास जाणवेल. वैचारिक दृष्टिकोन बदलून पहावा. खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत. हातातील अधिकार वापरता येतील. रागावर नियंत्रण ठेवावे.
मकर:-कौटुंबिक खर्चाचा आवाका लक्षात घ्यावा. नातेवाईकांशी मतभेद संभवतात. डोळ्याची वेळोवेळी काळजी घ्यावी. गप्पांच्या ओघात जबाबदारी घेऊ नका. हस्त कलेला उठाव मिळेल.
कुंभ:-मनातील अनामिक चिंता दूर साराव्यात. वेळेचे योग्य नियोजन करावे. अडथळ्यातून मार्ग काढावा. हजरजबाबीपणे वागाल. कमिशनच्या कामातून लाभ संभवतो.
मीन:-कागदपत्रे नीट जपून ठेवावीत. फसवणुकीपासून सावध राहावे. जामीनकीच्या व्यवहारात पडू नका. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. व्यावसायिक बदल लक्षात घ्यावेत.