Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा द्यावा

by Divya Jalgaon Team
October 26, 2020
in जळगाव
0
jalgaon news

जळगाव – जळगाव जिल्हा जागृत जनमंचच्या वतीने  मागणी करण्यात आली  आहे कि, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. या राजीनाम्याच्या मागे त्यांनी अनेक कारणे आपल्या निवेदनात दिली आहेत. या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे कि,  नागपूर मैट कोर्टाने कालच निकाल दिला कि,  कोणतीही तक्रार नसलेल्या ,कार्यकाळ पुर्ण न झालेल्या  ४० उपजिल्हाधिकारी आणि  तहसीलदारांच्या बदल्या महसूलमंत्री थोरात यांनी केल्या. त्या बदल्या नागपूर मैट  हायकोर्टाने बेकायदेशीर ठरवल्या आहेत.  तसेच वैयक्तिक स्वार्थासाठी पदाचा गैरवापर करून महाराष्ट्र गव्हर्मेंट सर्व्हंटस रेग्युलेशन आणि ट्रान्सफर एक्ट २००५ चे उल्लंघन  केलेले आहे.   महसूलमंत्री थोरात यांच्या सहीने झालेल्या बदल्यांच्या विरोधात नागपूर प्रशासकीय विभागातील ४ उपजिल्हाधिकारी आणि ८ तहसीलदारांनी मैट मधे धाव घेतली होती.

तसेच  जळगावचे तहसीलदार वैशाली हिंगे या २०१३ मधे भुसावळ चे तहसीलदार असताना शिंदी येथील इनामी जमीन विल्हेवाट करण्यासाठी १९लाख ५७ हजा ५०० रुपये  नजराणा बुडवला. त्यासाठी त्यांनी कलेक्टरचे आधिकार परस्पर वापरले. अशी तक्रार भुसावळ चे प्रांताधिकारी यांनी जळगाव कलेक्टरकडे केली आहे. हा नजराणा बुडवला कि गटवला? याचे उत्तर महसूलमंत्री म्हणून थोरातांनी दिलेच पाहिजे. जर थोरात प्रामाणिकपणे जनतेला,सरकारला सामोरा जात नसतील तर त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. नजराणा महसूल  बुडवणाऱ्या  तहसीलदार वैशाली हिंगे यांच्यावर थोरात कारवाई का करीत नाहीत? असाही सवाल विचारला गेला आहे.

वैशाली हिंगे या २०१३ मधे भुसावळ येथे तहसीलदार पदावर असताना २’६५५ शिधापत्रिका मधे अपहार केल्याची तक्रार नाशिक महसूल विभागीय आयुक्त यांनी १२-८-२०१५ मधे महसूल मंत्रीकडे केली आहे.त्यावर अजूनही  कारवाई केलेली नाही.

जळगाव जिल्ह्यातील गौण खनिज आधिकारी दिलीप चव्हाण यांनी  कोरे परमीट जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन, बांधकाम विभागाला दिले. तेथील कार्यकारी अभियंता नाईक यांनी खोटी माहिती लिहीलेले परमीट दप्तरी जोडून मक्तेदाराला  कामाचे बील पेमेंट अदा केले . त्यात रॉयल्टी भरल्याचा उल्लेख नाही. इनव्हाईस नंबर नाही. मुरुम, दगड वाहाण्यासाठी दुचाकी,तिनचाकी वाहने वापरल्याची नोंद आहे. एकाच वाहनचालकाने एकाच वेळी दहा वाहने चालवण्याचा उल्लेख आहे.पाचोरा तहसीलदाराचा बोगस शिक्का उमटवलेला आहे. परमीट खाली सही खाली गौण खनिज आधिकारीचे नांव नाही. तारीख नाही. महसूल खाते हे प्रशासनाचे प्रमुख खाते आहे. थोरातांनी रूसजन फुगून महसूल खात्याचे मंत्री पद मिळवले.पण कशासाठी? जनतेच्या सेवेसाठी कि वैयक्तिक आर्थिक हितासाठी?हे थोरातांनी जनतेला सांगावे.नसेल तितके नैतिक बळ तर राजीनामा द्यावा.

जळगाव जिल्ह्यातील महसूल खात्यातील भ्रष्टाचाराबाबत तक्रारी करण्यासाठी आम्ही संगमनेर पर्यंत थोरांतांचा पाठलाग केला.पण भ्रष्टाचार लपवण्याच्या हेतूने किंवा नैतिक बळ नसल्याने थोरातसाहेबांनी  पळ काढला. नागरिकांना भेटत नाहीत. भीतीने पळ काढतात.माहिती लपवण्याचा हा प्रयत्न आहे.हे मंत्रीपदास अशोभनीय आहे.थोरातसाहेब सर्वाधिक अकार्यक्षम मंत्री आहेत. म्हणून  महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. अशी मागणी  दीपककुमार गुप्ता, विजय दोधा पाटील, डॉ.  सरोज पाटील, शिवराम पाटील यांनी केली आहे.

Share post
Tags: Balasaheb ThoratJalgaon Jilha Jagrut ManchJalgaon newsMarathi News
Previous Post

रामेश्वर कॉलनीत ३२ वर्षीय तरूणाची आत्महत्या

Next Post

राजनंदिनी संस्थेतर्फे स्मशानभूमीतील सेवकांचा सत्कार

Next Post
jalgaon news

राजनंदिनी संस्थेतर्फे स्मशानभूमीतील सेवकांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group