जळगाव – रामेश्वर कॉलनीमध्ये राहणाऱ्या ३२ वर्षीय तरूणाने घराच्या छाताला साडीच्या मदतीने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. संतोष मोहन भालेराव (वय-३२, रा. पोहेगाव, ता. कोपरगाव जि. नगर ) असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
रामेश्वर कॉलनीतील गणपती मंदीरासमोर भाड्याच्या खोलीत राहणारा संतोष भालेराव हा एमआयडीसीतील चटई कंपनीत कामाला होता. गेल्या १० ते १२ वर्षांपासून जळगावात स्थायिक झाला होता. दोन वर्षांपुर्वी पत्नी माहेरी निघून गेल्या होत्या. त्यामुळे तो एकटाच राहत होता. आई व वडील यांचे निधन झालेले आहे.
घरात नैराश्येतून मध्यरात्री गळफास घेवून आत्महत्या केली. घरमालक संतोष बोलेकर रा. रामेश्वर कॉलनी हे सकाळी उठल्यानंतर घराचा दरवाजा आतून बंद होता. आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी दरवाजा उघडून पाहिला असता संतोष भालेराव याने छाताला साडीच्या मदतीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे दिसून आले. संतोषचे पाहुणे धर्मराज जगन्नाथ बनसोडे यांना घरमालक बोलेकर यांनी फोन करून साल्याने गळफास घेतल्याचे कळविले.
नातेवाईक आणि पोलीस घटनास्थळी धाव घेतली. पोलीसांनी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात रवाना केला. वैद्यकिय अधिकारी डॉ. सचिन अहिरे यांनी दिलेल्या माहितीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पो.कॉ. संतोष पवार, संदीप धनगर करीत आहे.