जळगाव, प्रतिनिधी । अमृत योजने अंतर्गत उभारण्यात येत असलेले पाण्याचे टाकीवर विदुयत पंप बसविण्याचे काम पूर्ण झाले असून शनिवारी सकाळी महापौर सौ.भारती सोनवणे यांनी कामाची पाहणी करून आढावा घेतला.
शहरातील सुप्रीम कॉलनीत नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी अमृत योजनेंतर्गत जलकुंभ आणि नवीन यंत्रणा उभारण्यात आली आहे. शनिवारी महापौर सौ. भारती सोनवणे यांनी कामाचा आढावा घेतला आणि अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, भगत बालाणी, गणेश सोनवणे, प्रभाग समिती सदस्य विठ्ठल पाटील, चंद्रकांत कापसे, मनपा अधिकारी अरविंद भोसले, बाबा साळुंखे, अमृत मक्तेदाराचे प्रतिनिधी पंकज बऱ्हाटे आदी उपस्थित होते. जलकुंभावर पाणी उपसा आणि पाणी वितरणासाठी आवश्यक असलेले विद्युत पंप बसविण्याचे काम पूर्ण झाले असून विद्युत रोहित्र बसविण्याचे काम सुरू आहे. जलकुंभाच्या संपूर्ण परिसराला लवकरात लवकर संरक्षक भिंत उभारावी आणि मुख्य जलवहिनीला सुप्रीमची जलवाहिनी जोडण्याचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करावे अशा सूचना महापौर सौ.भारती सोनवणे यांनी केल्या.
वाघूरच्या मुख्य जल वाहिनीला सुप्रीमची जलवाहिनी जोडण्यासाठी येत असलेली अडचण अधिकाऱ्यांनी लक्षात आणून देताच मक्तेदार आणि मनपा अधिकाऱ्यांची महापौरांनी मनपात बैठक घेतली. गणेश जयंतीचा मुहूर्त कोणत्याही परिस्थितीत टाळला जाऊ नये यादृष्टीने काम जलद गतीने पूर्ण करून दि.१० रोजी चाचणी घेण्यात यावी असेही महापौरांनी सांगितले.