जळगाव – गेल्या मागील अनेक महिन्यांपासून जगावर कोरोनारुपी राक्षसाचे सावट पसरलेले आहे. यामुळे सर्वांना खूप वाईट परिस्थितीचा सामना करावा लागला. या कोरोनामुळे संपूर्ण ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आले, कारण हि महामारी अत्यंत भयंकर स्वरूपाची आहे. या आजारामुळे अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले. या वाईट परिस्थितीत कोणी कोणाला मदतीला धावून येत नव्हतं. याला अपवाद म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेले डॉकटर, नर्स तसेच पोलीस कर्मचारी यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता माणुसकी निभवत कोरोनाशी गंभीर लढा दिला. म्हणून त्यांना आपण कोरोना योद्धा मानून सलाम करतो.जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना योद्धयांना सलाम.
याच पाश्र्वभूमीवर जळगाव शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोनाच्या काळात अनेक डॉकटर, नर्स तसेच वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता दिवस रात्र आपले कर्तव्य बजावत आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना योद्धयांना सलाम .
कोरोना पॉसिटीव्ह रुग्ण हा आधीच आजाराने हैराण झालेला असतो, त्याला व्यवस्थित आपुलकीने समजावून त्याची पूर्ण काळजी घेऊन याला नैराश्यातून बाहेर काढून कोरोना सोबत झुंझ देण्यासाठी हे कर्मचारी त्याला सक्षम करीत आहेत. त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करून त्यांना लवकर आजारातून बाहेर काढण्याचा अतोनात प्रयत्न करीत आहेत. त्यांना वेळेवर जेवण देणे, निगा राखणे, व्यवस्थित उपचार करून त्यांना आपले समजून त्यांचे सांत्वन करून त्यांना लवकर बरे होण्यास मदत करत आहेत.
दसऱ्याच्या पावन सणानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयातून अनेक रुग्ण कोरोनावर मात करून सुखरूप घरी परतले आहेत. त्यांच्या निरोपाप्रसंगी कोविड वार्डात रांगोळी काढून सजवण्यात आले होते. तसेच यावेळी डीन. डॉ. जयप्रकाश रामानंद, डॉ. विजय गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सोनार, परीसेविका आर. एम. वळवी, माया वानखेडे, शामल चौधरी, सुरेख वसावे, अधिपरिचारिका, वॉर्डबॉड, सफाई कामगार तसेच सर्व स्टाफ उपस्थित होता.
अजून वाचा
दिव्यांग सेनेचा आयुक्तांना आंदोलनाचा इशारा