Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

धक्कादायक! प्रेयसीची हत्या करुन मृतदेह गाडला भिंतीत

by Divya Jalgaon Team
February 7, 2021
in गुन्हे वार्ता, राज्य
0
बेकायदेशीर गावठी बनावटीची दारू तयार करणारी महिला अटकेत

मुंबई – पालघरच्या वृंदावन दर्शन कॉम्पेल्समध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्तीनं आपल्या लिव्ह इन पार्टनरची हत्या करुन तिचा मृतदेह फ्लॅटमध्येच भिंतीत गाडला. या घटनेनं संबंधित परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

वृंदावन दर्शन कॉम्प्लेक्सच्या फ्लॅट क्रमांक १०१ मध्ये सूरज हरमळकर आणि त्याची लिव्ह इन पार्टनर अमिता मोहिते राहत होते. जवळपास राहणाऱ्या रहिवाशांना बरेच दिवस सूरज दिसत नव्हता. तर अमिताचाही काही मागमूस लागत नव्हता. रहिवाशांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस जेव्हा सूरजच्या फ्लॅटमध्ये पोहोचले तेव्हा त्यांना फॉरेन्सिक एक्सपर्ट, रुग्णवाहिका यांच्यासह काही कामगारांनाही बोलवावं लागलं. समोर आलेल्या माहितीनुसार, फ्लॅटच्या बाथरुममधील भिंतीत एक मृतदेह पुरण्यात आला होता. मृतदेह ३२ वर्षीय अमिताचा असल्याचंही निष्पन्न झालं आहे. सूरज आणि अमिता या फ्लॅटमध्ये भाडेतत्वावर राहत होते.

बाथरुमच्या भिंतीत अमिताचा मृतदेह बऱ्याच दिवसांपासून लपविण्यात आला होता. अमिताचा मृत्यू होऊन तब्बल चार महिने झाल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी जेव्हा मृतदेह बाहेर काढला तेव्हा तो कुजलेल्या अवस्थेत होता. सूरज याला पोलिसांनी अटक केली असून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Share post
Tags: #PaldharcrimeMarathi NewsMumbaiधक्कादायक! प्रेयसीची हत्या करुन मृतदेह गाडला भिंतीत
Previous Post

आजचे राशीभविष्य, रविवार, ७ फेब्रुवारी २०२१

Next Post

सीआरपीएफच्या कोब्रा पथकाचा ३४ महिलांचा समावेश, नक्षलग्रस्त भागात तैनात

Next Post
सीआरपीएफच्या कोब्रा पथकाचा ३४ महिलांचा समावेश, नक्षलग्रस्त भागात तैनात

सीआरपीएफच्या कोब्रा पथकाचा ३४ महिलांचा समावेश, नक्षलग्रस्त भागात तैनात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group