जळगाव, प्रतिनिधी । सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा मोठा झटका आहे. केंद्र सरकाने केलेल्या गॅस दरवाढी विरोधात आज राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे हरी विठ्ठल नगरात जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर चूल मांडून आंदोलन करण्यात आले.
घरगुती गॅसच्या किंमतीत मोठी वाढ झालीय. तेल कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किंमती जाहीर केल्यायत. हे दर प्रति सिलिंडर २५ रुपयांनी वाढवण्यात आलेयत. व्यावसायिक सिलेंडरचे दर सहा रुपयांनी वाढवण्यात आलेत. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीने हरी विठ्ठल नगरात रस्त्यावर चूल मांडून भाकरी भाजण्याचे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी मीनाक्षी चव्हाण, कमल पाटील, लता पाटील, चित्रा देवरे, ममता तडवी, जयश्री पाटील, शकुंतला धर्माधिकारी, दिव्या भोसले, कोमल पाटील, जुलेखा शहा, आदी पदाधिकारी उपस्थित होत्या.


