Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

खुशखबर; रेल्वेने सुरू केल्या ‘या’ नवीन रेल्वेगाडया

by Divya Jalgaon Team
February 6, 2021
in राष्ट्रीय
0
रेल्वे प्रवासात रात्री मोबाईल, लॅपटॉप चार्ज करता येणार नाही

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – प्रवाशांच्या सोयीसाठी, भारतीय रेल्वेने 2018-19 आणि 2019-20,या कालावधीत नवीन रेल्वेगाडया सुरू केल्या आहेत. रेल्वे सेवा अद्ययावत करणे आणि प्रवाशांना सुधारित सुविधा पुरविणे यासाठी भारतीय रेल्वेचा सतत प्रयत्न असतो.

या दृष्टीने प्रवाशांना उत्तम प्रवासाचा अनुभव देण्यासाठी रेल्वेने पुढील वंदे भारत एक्स्प्रेस, हमसफर, तेजस, अंत्योदय, उत्कृष्ट डबल डेकर एअर कंडिशन्ड यात्री (यूडीएवाय) सारख्या प्रीमियम सेवा सुरू केल्या आहेत.पीआयबीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

वंदे भारत एक्स्प्रेस: अत्याधुनिक गाड्या असलेली ही वंदे भारत सेवा नवी दिल्ली – वाराणसी आणि नवी दिल्ली- श्री माता वैष्णो देवी कटरा या भागात सुरू करण्यात आली आहे. या गाड्यांमध्ये त्वरित वेगात बदल, ऑन बोर्ड इनफोटेमेंट आणि ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम (जीपीएस) आधारित प्रवासी माहिती प्रणाली, स्वयंचलित सरकते दरवाजे, रिट्राक्टेबल फुटस्टेप्स आणि शून्य डिस्चार्ज व्हॅक्यूम बायो टॉयलेट्स इत्यादी अत्याधुनिक वैशिष्ट्ये आहेत.

तेजस एक्स्प्रेस सेवा: तेजस एक्स्प्रेसच्या सर्व 04 जोड्या भारतीय रेल्वे मार्गावर सुरू केल्या आहेत. यापैकी दोन 22119/22120 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-करमळी तेजस एक्स्प्रेस आणि 22671/22672 चेन्नई एग्मोर – मदुराई जं तेजस एक्स्प्रेस भारतीय रेल्वे चालवत आहे, तर अन्य दोन तेजस गाड्या, 82501/82502 लखनऊ-नवी दिल्ली तेजस एक्स्प्रेस आणि 82901/82902 मुंबई सेंट्रल-अहमदाबाद तेजस एक्सप्रेस इंडियन रेलवे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) चालवते.

उदय सेवा: उत्कृष्ट डबल-डेकर एअर-कंडिशन्ड यात्री (यूडीएवाय) एक्सप्रेस कार्यान्वित झाली आहे. 22665/22666 बंगळुरू शहर – कोईम्बतूर यूडीएवाय एक्सप्रेस आणि 22701/22702 विशाखापट्टणम-विजयवाडा जं. यूडीएवाय एक्सप्रेस भारतीय रेल्वे मार्गावर सुरु करण्यात आली आहे.

हमसफर, तेजस, अंत्योदय, उत्कृष्ट डबल डेकर वातानुकूलित यात्री (यूडीएवाय), महामना आणि दीन दयालु आणि अनुभूती यासारखे डबे सुरु करण्यात आल्या आहेत. रेल्वे, वाणिज्य व उद्योग आणि ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री, पीयूष गोयल यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

Share post
Tags: #New StartMarathi NewsNew DelhiTrainखुशखबर; रेल्वेने सुरू केल्या 'या' नवीन रेल्वेगाडया
Previous Post

Breaking : अभिनेता श्रीवास्तव चंद्रशेखरने केली आत्महत्या

Next Post

प्रभाससोबत करणार लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा बॉलीवूडमध्ये एन्ट्री

Next Post
प्रभाससोबत करणार लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा बॉलीवूडमध्ये एन्ट्री

प्रभाससोबत करणार लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा बॉलीवूडमध्ये एन्ट्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group