जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पायी चालत असतांना वृद्धाच्या हातातून दुचाकीवरील अज्ञात चोरट्यांनी मोबाईल लंपास केल्याची घटना शुक्रवारी ५ रोजीच्या रात्री ९ वाजता घडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून पायी चालत असतांना सुनील पाटील रा. भास्कर मार्केट हे आपल्या पत्नी पुष्पा सुनिल चौधरी यांच्यासोबत आकाशवाणी चौक ते स्वातंत्र्य चौक शुक्रवारी ५ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास जेवण झाल्यानंतर शतपावली करण्यासाठी निघाले.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पायी जात असतांना दोन अज्ञात चोरटे दुचाकीवर येवून हातातील १० हजार रूपये किंमतीचा मोबाईल हिसकावून पसार झाले आहे. त्यांनी दोघांना शोधण्याचा प्रयत्न केला असता चोरटे मिळून आले नाही. त्यांनी तातडीने जिल्हापेठ पोलीस स्थानकात धाव घेतली. पुष्पा चौधरी यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.