यावल (रविंद्र आढाळे) – येथील तहसील कार्यालयात महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने महाराजस्व अभियानाअंतर्गत कुटुंब अर्थ सहाय्य योजनेअंतर्गत धनादेश , मतदान ओळखपत्र,जातीचे दाखले , शिधापत्रीका , उत्पन्नाचे दाखले वितरणाचे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या उपस्थितीत व हस्ते पार पडले.
यावल येथील तहसील कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय ईमारतीत आज दिनांक ६ फेब्रुवारी रोजी महाराजस्व अभीयानाअंतर्गत विविध प्रकारच्या दाखल्यांच्या वितरणाचे कार्यक्रम आमदार तथा प्रदेश कॉंग्रेसचे नवनियुक्त उपाध्यक्ष शिरीष मधुकरराव चौधरी, जिल्हा परिषदचे गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे , जिल्हा परिषद सदस्य आर.जी . पाटील ( नाना ) , पंचायत समितीचे माजी सभापती लिलाधर विश्वनाथ चौधरी , यावल पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील , कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेरअमन तुषार उर्फ मुन्ना पाटील , इंटकचे जिल्हा अध्यक्ष भगतसिंग पाटील , काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान, नगरसेवक मनोहर सोनवणे , तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष हाजी गफ्फार शाह