मुंबई: केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवर कृषी अधिभार लावण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे पेट्रोलवर अडीच तर डिझेल चार रुपयांनी महागणार आहे. इंधनावरील अबकारी करात सातत्याने वाढत आहे. त्यामुळे इंधन स्वत होईल हि अपेक्षा फोल ठरत आहे. अबकारी कराबाबत दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेलचे दरवाढीमुळे जनता त्रस्त आहे. यावरून विरोधक सरकारवर टीकेची झोड उठवत आहेत.
या पार्श्वभूमीवर आज राज्यभर दिवसेंदिस वाढणाऱ्या दराने इंधन दरवाढी विरोधात शिवसेना राज्यभर मोर्चे काढणार आहे. एकंदरीत शिवसेनेने पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवर आंदोलनावर पुकारले आहे.
यामध्ये इंधन दरवाढीचा विरोध करण्यासाठी केंद्र सरकारविरोधात शिवसेनेच्या वतीने जिह्याजिह्यात निदर्शने करण्यात येणार आहेत. बैलगाडय़ा, सायकल मार्च काढून केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल-डिझेल दरवाढीचा तीव्र निषेध केला जाईल. राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालये तसेच शासकीय कार्यालयांसमोर प्रामुख्याने ही निदर्शने केली जाणार आहेत.
दरम्यान, यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रहार केला आहे. शिवसेनेने मोर्चे काढण्याची नौटंकी करू नये, राज्य सरकारने पेट्रोल डिझेलवरचे टॅक्सेस कमी करावेत आणि भाववाढ नियंत्रणात आणावी, असं म्हणत फडणवीस यांनी शिवसेनेच्या आंदोलनाचा फोलपणा उघड केला आहे.