Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

पुन्हा झटका : सिलिंडरच्या दरात सलग दुसऱ्या दिवशीही वाढ

by Divya Jalgaon Team
February 5, 2021
in राष्ट्रीय
0
स्वयंपाकाच्या गॅसशी संबंधित नियमात होणार बदल; जाणून घ्या

नवी दिल्ली – पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे आधीच महागाईच्या झळा सहन करत असलेल्या सर्वसामान्यांचे अर्थचक्र अधिकच मेटाकुटीला येण्याची चिन्हे आहेत. इंधन दरांपाठोपाठ आता सिलिंडरच्या दरातही २५ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प सादर होऊन जेमतेम चार दिवस होत नाहीत तोच पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत ३५ पैशांची वाढ झाल्याची नोंद आहे. तर १४ किलो वजनाच्या सिलिंडरच्या दरांत २५ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरांमधील वाढीची झळ सर्वसामान्यांना पोहोचत आहे. पेट्रोल- डिझेलच्या दरात विक्रमी वाढ झाल्यामुळे महागाईचा भडका उडणार आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत अचानक वाढ झाली आहे. गेल्या तीन दिवसांत क्रूड तेलाची किंमत ५९ डॉलर प्रति बॅरल एवढी झाली आहे. सौदी अरेबियाने तेलाचे उत्पादन कमी केल्याने ही दरवाढ झाली आहे. इंधनाची अंतिम किंमत ही केंद्राचे आणि राज्यांचे उत्पादन शुल्क व मूल्यवर्धित कर यांच्या एकत्रित बेरजेवरून ठरते. या किमतींचा भार ग्राहकांवर पडत आहे.

– मुकेशकुमार सुराणा, अध्यक्ष, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि.

डिझेलच्या दरवाढीमुळे अनेक क्षेत्रांवर परिणाम होणार आहे. या दरवाढीमुळे शेतकऱ्यांचा सिंचन खर्च वाढेल, तसेच वाहतूक भाडेही वाढेल. त्यातून जीवनावश्यक वस्तू महाग होतील, असे जाणकारांचे मत आहे.

सिलिंडरच्या किमती

मुंबई : ७१० रुपये

नवी दिल्ली : ७१९ रुपये

कोलकाता : ७४५ रुपये

चेन्नई : ७३५ रुपये

पेट्रोलच्या किमती (प्रतिलिटर)

मुंबई : ९३.२० रुपये

नवी दिल्ली : ८६.६५ रुपये

कोलकाता : ८८.०१ रुपये

चेन्नई : ८९.१३ रुपये

डिझेलच्या किमती (प्रतिलिटर)

मुंबई : ८३.६७ रुपये

नवी दिल्ली : ७६.८३ रुपये

कोलकाता : ८०.४१ रुपये

चेन्नई : ८२.०४ रुपये

Share post
Tags: पुन्हा झटका : सिलिंडरच्या दरात सलग दुसऱ्या दिवशीही वाढ
Previous Post

आजचे राशीभविष्य, शुक्रवार, ५ फेब्रुवारी २०२१

Next Post

आज पेट्रोल – डिझेलच्या दरात वाढ, किती आहे दर जाणून घ्या

Next Post
सलग चौथ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ, जाणून घ्या

आज पेट्रोल - डिझेलच्या दरात वाढ, किती आहे दर जाणून घ्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group