नवी दिल्ली, वृत्तसंस्था – डॉलर बळकट होत असल्यामुळे जागतिक बाजारात सोन्याचे दर कमी होत आहेत. दरम्यानच्या काळामध्ये भारत सरकारने सोन्यावरील आयात शुल्क कमी केले आहे. याचा एकत्रित परिणाम होऊन सोन्याचे दर कमी होत आहेत.
गुरुवारी सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या दरात घट नोंदली गेली. दिल्ली सराफात सोन्याचे दर 322 रुपयांनी कमी होऊन 47,135 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. त्याचबरोबर तयार चांदीचे दर 972 रुपयांनी कमी होऊन 67,170 रुपये प्रति किलो झाले.
जागतिक बाजारात सोन्याचे दर कमी होऊन 1,825 डॉलर प्रति औंस तर चांदीचे दार 26.61 डॉलर प्रति औंस झाले.