Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

“शावैम”मध्ये एक लाख कोरोना नमुने तपासणी पूर्ण

अत्याधुनिक उपकरणांच्या उपलब्धतेमुळे ‘लवकर निदान, लवकर उपचार’ झाले शक्य

by Divya Jalgaon Team
February 4, 2021
in आरोग्य, जळगाव, प्रशासन
0
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात दिवसभर २९४ दिव्यांगांची तपासणी

जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गुरुवारी ४ फेब्रुवारी रोजी सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेत कोरोनाच्या नमुना तपासण्यांची संख्या एक लाखावर पोहोचली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि कमी वेळात तपासणी करून देण्याचे उद्दिष्ट पूर्ण करीत केवळ साडे आठ महिन्यातच एक लाख तपासणी करून ‘लवकर निदान,लवकर उपचार’ करण्यात शासकीय वैद्यकीय यंत्रणेला यश आलेले आहे.

सुरुवातीला जिल्ह्यात सदर प्रयोगशाळा सुरु नसल्याने जिल्ह्यातील कोरोना नमुने तपासणीसाठी दुसऱ्या जिल्ह्यात पाठवावी लागत होती. नंतर आयसीएमआर आणि डीएचआर यांच्या सूचनेनुसार पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी, अधिष्ठाता यांनी प्रयत्न करून विषाणू निदान व संशोधन प्रयोगशाळा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे २२ मे २०२० पासून सुरु करण्यात आली. त्यानंतर तपासणी अहवाल जलद प्राप्त होऊन संशयित रुग्णांना वेळीच योग्य ते उपचार होण्यास मदत झाली.

सुरुवातीला १०० ते १४० संशयित रुग्णांची तपासणी करण्यात येत होती. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला जैन इरीगेशन जैवतंत्रज्ञान विभागातून एक अतिरिक्त आरटीपीसीआर चाचणी तपासणीचे मशीन प्राप्त झाले. त्यामुळे आता प्रयोगशाळेची नमुने तपासणीची क्षमता दिवसाला ५०० एवढी वाढली आहे. गुरुवार दि. ४ फेब्रुवारी रोजीपर्यंत करण्यात आलेल्या एकूण चाचण्यापैकी ९ हजार ९८६ रुग्ण (९.९८ टक्के) पॉझीटीव्ह आढळले आहे. महाविद्यालय व रुग्णालयाला अत्याधुनिक “ऑटोमेटेड आरएनए एक्स्टेक्शन” मशीन देखील प्राप्त झाले असून त्यामुळे चाचण्यांच्या संख्येत वाढ अपेक्षित आहे.

प्रयोगशाळेच्या तपासणीसाठी लागणारे उपकरण व किट्स वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांचेमार्फत हाफकिन, मुंबई यांचेकडून उपलब्ध करून दिले जात आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे प्रशासक डॉ. बी. एन. पाटील, अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली प्रयोगशाळेत विभागप्रमुख डॉ. किशोर इंगोले, डॉ. शुभांगी डांगे, डॉ. प्रियंका पाटील, डॉ. प्रियंका शर्मा यांच्यासह प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लिपिक, चतुर्थश्रेणी कर्मचारी परिश्रम घेत आहे.

“सध्या विषाणू निदान व संशोधन प्रयोगशाळेत कोरोना संशयित रुग्णांचे नमुने तपासले जात आहेत. शिक्षक, पोलीस, सरकारी कर्मचारी, विद्यार्थी, विदेश प्रवास करू इच्छीणारे आदींचा समावेश आहे. कोरोना चाचण्यांव्यतिरिक्त डेंग्यू, स्वाइन फ्लू, चिकन गुनिया, हेपेटायटीस आणि इतर विषाणूजन्य रोगांचे निदान करण्यात येणार आहे. कमी वेळेत एक लाख चाचण्या पूर्ण झाल्यामुळे प्रयोगशाळेची उपयुक्तता सिद्ध झाली आहे.”
-डॉ. जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता.

Share post
Tags: "शावैम"मध्ये एक लाख कोरोना नमुने तपासणी पूर्णJalgaonMarathi News
Previous Post

केंद्र सरकारच्या कार्यक्षमता चाचणीत जळगाव रुग्णालयाच्या कामगिरीचा सन्मान

Next Post

सोने-चांदीच्या दरात मोठी घट; जाणून घ्या आजचा दर

Next Post
सोन्याचा भाव पुन्हा वधारला, चांदीत घसरण, जाणून घ्या आजचे दर

सोने-चांदीच्या दरात मोठी घट; जाणून घ्या आजचा दर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group