इराणने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला आहे. या सर्जिकल स्ट्राईकनंतर इराणने पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या ताब्यात असलेले त्यांच्या दोन सैनिकांची सुटका केली आहे. या सैनिकांना जैश-उल-उद या दहशतवादी संघटनेने या दोन सैनिकांची अडीच वर्षापूर्वी अपहरण केले होते.
इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्ड या एलिट फोर्सच्या गुप्तचर यंत्रणांनी त्या दोन सैन्यांना कुठे डांबून ठेवले याची माहिती दिली होती. त्या माहितीनंतर इराणच्या या फोर्सने सर्जिकल स्ट्राईकचा योजना आखली व त्याआधारे त्यांच्या सैनिकांची सुटका केली. मंगळवारी रात्री हा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला होता.
जैश उल- अदल ही दहशतवादी संघटना इराण सरकारविरोधात कारवाया करत असते. इराणमध्ये बलुच सुन्नींवर होणाऱ्या अत्यांचाराविरोधात लढा देत असल्याचा दावा या दहशतवाद्यांकडून करण्यात येतो.