जळगाव – शहरातील तुकारामवाडी भागात ज्ञानेश्वर जगन्नाथ महाजन (वय ६१) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी समोर आली . गळफास घेऊन दोन दिवस उलटल्यानंतर मृतदेहाची दुर्गंधी सुटल्याने सुटल्याने रविवारी हा प्रकार उघडकीस आला.
शहरातील तुकारामवाडी येथे ज्ञानेश्वर महाजन हे एकटेच राहतात. हातमजुरी करून ते उदरनिर्वाह भागवत होते. पत्नी व दोन मुले हे दुसरीकडे राहतात. तुकारामवाडी परिसरात ज्ञानेश्वर महाजन यांच्या शेजारी राहत असलेल्या त्यांच्या नातेवाईकांना विचित्र दुर्गंधी सुटल्याचे जाणवले. दोन दिवसांपासून ज्ञानेश्वर महाजन यांचाही दरवाजा बंद होता. शंका आल्याने त्यांनी पाहणी केली असता ज्ञानेश्वर महाजन हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसुन आले. तसेच याचमुळे दुर्गंधी सुटल्याचेही निष्पन्न झाले. याबाबत परिसरातील नागरिकांना एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली.
माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल मोरे , हेडकॉन्स्टेबल रतीलाल पवार, पोलिस कॉन्स्टेबल साईनाथ मुंडे यांनी घटनास्थळ गाठले. दोन दिवस उलटल्याने मृतदेह पुर्णपणे कुजलेला होता. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून नागरिकांच्या मदतीने मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात हलविला. याप्रकरणी जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पाटील यांच्या माहितीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.