Wednesday, April 1, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील 11, 12 रोजी जिल्हा दौऱ्यावर

by Divya Jalgaon Team
February 3, 2021
in जळगाव, राजकीय
0
कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जयंत पाटील यांच्यासमोरच जोरदार हाणामारी

जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे परिवार संवाद कार्यक्रमानिमत्त काढलेल्या राज्यव्यापी दौर्‍यात जळगाव जिल्ह्यात दोन दिवस येत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी परिवार संवाद या मोहिमेच्या अंतर्गत राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. या अनुषंगाने ते जळगाव जिल्हा दौर्‍यावर ११ व १२ फेब्रुवारी रोजी येणार आहेत.

११ फेब्रुवारीला सकाळी जयंत पाटील यांचे पाडळसरे येथे आगमन होईल. त्यानंतर धरणावर अमळनेरात आढावा बैठक होईल. त्यानंतर पाडळसरे येथे राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रम झाल्यावर ते अमळनेर येथे बैठक घेणार आहेत. यानंतर जयंत पाटील पारोळा येथे एरंडोल मतदार संघाची आढावा बैठक घेतील. तेथून पाचोरा येथे रवाना होतील. पाचोर्‍यात कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेऊन मंत्री पाटील जामनेरात येतील. तेथे विधानसभा मतदार संघातील आढावा बैठकीनंतर ते जळगाव येथे अभिषेक पाटील यांच्याकडे मुक्कामी असतील.

दुसर्‍या दिवशी त्यांची भुसावळ, मुक्ताईनगर, फैजपूर आणि चोपडा येथे आढावा बैठक होणार आहे. आगामी सहकार आणि त्यांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर जयंत पाटील यांचा हा दौरा अतिशय महत्वपूर्ण मानला जात आहे. तसेच या दौर्‍यात ते तापी खोरे विकास महामंडळासह जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक घेणार आहेत.

Share post
Tags: 12 रोजी जिल्हा दौऱ्यावरJalgaonMarathi NewsPoliticalराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील 11
Previous Post

मुंबई वाहतूक पोलिसांना बॉडी कॅमेरे, पुढील आठवडय़ापासून केला जाणार वापर

Next Post

जळगावातील ग. स. सोसायटीचे संचालक मंडळ बरखास्त

Next Post
ग.स. सोसायटीचे नेरकर व ठाकरेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

जळगावातील ग. स. सोसायटीचे संचालक मंडळ बरखास्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group