Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावातील अयोध्या नगरात ५७ हजाराची घरफोडी

by Divya Jalgaon Team
February 2, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावातील अयोध्या नगरात ५७ हजाराची घरफोडी

जळगाव प्रतिनिधी । अयोध्यानगरात बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी कपाटातील ५७ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे सोमवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीला आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घर मालक कल्पेश संतोष पाटील (वय-२४) रा. अयोध्या नगर हे आई व वडील संतोष नारायण पाटील व पत्नी यांच्यासह राहतात. कल्पेश पाटील आणि संतोष पाटील हे खासगी नोकरी करतात. १ फेब्रुवारी रोजी सकाळी दोघे कामाला निघुन गेले. कल्पेश यांच्या आई कामानिमित्त गावात गेल्या होत्या. त्यांना सायंकाळी ५.३० ते ५.५५ वाजेदरम्यान घेण्यासाठी कल्पेश पाटील यांच्या पत्नी घर बंद करून गेल्या होत्या. सासू व सून घरी आल्यावर पाहिले असता घरातील अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याच उघडकीला आले.

घरात कपाटात ठेवलेले ३७ हजार ५०० रूपये किंमतीची सोन्याची मंगलपोत, १५ हजार रूपये किंमतीचे मनी मंगळसुत्र, ५ हजार रूपये किंमतीचे चांदीचे भार असा एकुण ५७ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. तसेच कपाटातील सामान अस्तव्यस्त करण्यात आले होते.

कल्पेश पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय नेरकर करीत आहे.

Share post
Tags: crimeJalgaonMarathi Newsrobberyजळगावातील अयोध्या नगरात ५७ हजाराची घरफोडी
Previous Post

मानराज परिसरातील द्रौपदी नगरात चार लाखांची चोरी

Next Post

टेलीफोन नगरातील बंद घर केले चोरट्यांनी टार्गेट

Next Post
चोरट्यांनी एक नवे तर तब्बल चार ठिकाणी केली घरफोडी

टेलीफोन नगरातील बंद घर केले चोरट्यांनी टार्गेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group