जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील मानराज परिसरात द्रौपदी नगरात कंपनीत कामावर केलेल्या कामगाराचे बंद घर फोडून सोन्या चांदीच्या दागीन्यांसह रोकड असा एकुण ४ लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मानराज पार्क परिसरात द्रोपती नगरात प्लॉट नं 11 येथे राजी जयप्रकाश नायर वय 48 हे वास्तव्यास आहेत. सोमवारी ते घराला कुलूप लावून ते बंद करुन नेहमीप्रमाणे एमआयडीसीत असलेल्या कंपनीत कामावर गेले होते. दुपारी 3 वाजेच्या सुमारास चोरट्यांनी लाकडी दरवाजाचे कोयंडा व कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला व घरातील कपाटातून एक लाखांची रोकड, एक लाख रुपये किंमतीचे कानातले,
तसेच 2 लाख रुपये किंमतीचे सोन्याची चैन, मंगळसूत्र व कानातले असे 10 तोळे दागिणे असा एकूण 4 लाख रुपये किंमतीचा चोरुन नेला. ८ वाजेच्या सुमारास नायर कंपनीतून घरी परतले असता, त्यांना घराचा दरवाजाचे कुलूत तुटलेले घरात सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसला. चोरीची खात्री झाल्यावर नायर यांनी जिल्हापेठ पोलिसांना प्रकार कळविला.
माहिती मिळाल्यानुसार जिल्हापेठ पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक महेंद्र वाघमारे, पोलीस उपनिरिक्षक मगन मराठे, गुन्हे शोध पथकातील नाना तायडे यांनी घटनास्थळ गाठले तसेच पाहणी करुन माहिती जाणून घेतली. याप्रकरणी राजी नायर यांच्या फिर्यादीवरुन जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक महेंद्र वाघमारे हे करीत आहेत.