पुणे – २०१९-२० या आर्थिक वर्षात भारताने १,५६,००० इलेक्ट्रिक वाहने विकली, त्यापैकी १,५२,००० दुचाकी वाहने होती.
कोविड -१९ महामारीच्या नंतरच्या काळात ई-वाहनांची मागणी वाढण्याची अपेक्षा आहे कारण ग्राहक खासगी वाहतुकीसाठी पर्यावरणास अनुकूल आणि खर्च वाचविण्यासाठी ई वाहनास पसंती देताना दिसत आहे.
तसेच एव्हेंडस कॅपिटलच्या अहवालानुसार २०२४-२५ पर्यंत इलेक्ट्रिक दुचाकींची बाजारपेठ १२ हजार कोटी रुपयांवर पोहोचू शकते. २०२४-२५ पर्यंत ते ९ टक्के पर्यंत पोहोचतील असा अंदाज असून त्यांच्यात १६ टक्के दराने वाढ होण्याची क्षमता आहे.अशी माहिती ई बाईक बनविणाऱ्या वार्डविझार्ड समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यतीन गुप्ते यांनी दिली.
वॉर्डविझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी या ई बाईक उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आभासी स्वरूपात करण्यात आले त्यावेळी गुप्ते यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. तसेच या नवीन प्रकल्पाद्वारे ६ हजार पेक्षा अधिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार असल्याचे गुप्ते यांनी सांगितले.
या प्रकल्पाबाबत माहिती देताना गुप्ते म्हणाले की, “आम्हाला आनंद झाला आहे की इतक्या थोड्या काळामध्ये, आम्हाला आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भरतेसाठी आवाहन करण्यास प्रेरित केले आहे. याला अनुसरून इंडिया अँड मेक इन इंडिया. “विस्ताराचे काम पूर्ण केले आहे. या ई-बाइक्स आफ्रिका, मध्य पूर्व आणि युरोपमध्ये निर्यात करण्याचीही कंपनीची योजना आहे. कंपनी इतर ई-वाहन ब्रॅण्डबरोबर त्यांची उत्पादन सुविधा पुरवण्यासाठी भागीदारी करण्यास तयार आहे.
येत्या ३ ते ४ वर्षांत कंपनीने ५०० ते ६०० कोटी रुपयांचे महसूल लक्ष्य ठेवले आहे आणि कंपनी इलेक्ट्रिक तीन चाकी वाहन निर्मिती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. इलेक्ट्रिकवर चालणारी वाहने पर्यावरणास अनुकूल असल्यामुळे तसेच येत्या काळात इंधनावर चालणाऱ्या जुन्या वाहनांवर केंद्र सरकारने निर्बंध आणल्यामुळे ई वाहन खरेदी करण्यास लोकांचा काल असणार आहे असे दिसून येते.