यावल – तालुक्यातील चिखली बु, येथे कॉंग्रेस कमेटीच्या अनुसुचित जाती विभागाच्या वतीने येथील वाचनलयास पोलीस भरती पुर्व अभ्यासासाठीचे मार्गदर्शन पुस्तकांची भेट देण्यात आली.
देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने काँग्रेस कमेटीच्या अनुसुचित जाती विभागाच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकला इंगळे व ह.भ.प . पुंडलीक महाराज यांच्या हस्ते गावातील युवकांच्या आपले उज्वल भविष्य घडविण्यासाठी पोलिस भरतीपुर्वी अभ्यासासाठी मार्गदर्शन पुस्तकांची भेट येथील स्वामी विवेकांनद वाचनायलयास देण्यात आली.
याप्रसंगी ह.भ.प . पुंडलीक महाराज यांनी आपल्या कडुन युवकांनी वाचनातुन समाज प्रबोधनासह समाजहिताच्या दृष्टीकोणातुन चांगले आणी विधायक उपक्रम राबवावी या करीता २१०० रूपयांची देणगी दिली.
यावेळी अभीषेक इंगळे, तुषार पाटील , दिपक पाटील , विशाल कोळी , चेतन पाटील यांच्यासह मोठया संख्येने तरुण उपस्थित होते .