मुंबई : माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने चित्रपटगृह 100 टक्के क्षमतेसह उघडण्याची परवानगी दिली आहे. आता यानुसार देशाभरातील सर्वच चित्रपटगृहे 1 फेब्रुवारीपासून 100 टक्के क्षमतेसह सुरू होतील. कोरोनाचा प्रसार होऊ नये याकरिता गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटगृह 50 टक्के क्षमतेसह उघडण्याची परवानगी दिली होती. याचा फटका चित्रपटांना बसताना दिसत होता. यामुळे अनेकांना आपले चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित केले होते.
मात्र, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने चित्रपटगृह 100 टक्के क्षमतेसह उघडण्याची परवानगी दिली असली तरी देखील चित्रपटगृह 100 टक्के क्षमतेसह उघडण्यासाठी बऱ्याच नियम आणि अटी घालून दिल्या आहेत. याचे पालन चित्रपटगृह व्यवस्थापनाला करावे लागणार आहे. The
1. चित्रपटगृहामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये कमीतकमी 6 फूट अंतर राखणे बंधनकारक असेल.
2. चित्रपटगृहांमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या तोडाला मास्क बंधनकारक आहे.
3. चित्रपटगृहांमध्ये प्रवेश करताना आणि बाहेर पडताना दोन्ही ठिकाणी सॅनिटायझर ठेवणे बंधनकारक आहे.
4. चित्रपटगृहांच्या परिसरात थुंकण्यास कडक निषिद्ध
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) सूर्यवंशी (Sooryavanshi) चित्रपटाची चाहत्याते आतुरतेने वाट पाहत होते. 50 टक्के क्षमतेसह चित्रपटगृहे सुरू होते. यामुळे बिग बजेटचे चित्रपट रिलीज केले जात नव्हते त्यापैकीच सूर्यवंशी हा चित्रपट होता. बॉलिवूडमध्ये अनेक निर्माते चित्रपटगृहे 100 टक्यांने सुरू होण्याची वाट गेल्या अनेक दिवसांपासून पाहात होते.
आता 50 टक्क्यांनी चित्रपटगृहे सुरू झाल्यामुळे बॉलिवूडमधील एकापेक्षा एक बिग बजेटचे चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट देखील आहे. अयान मुखर्जी यांनी हा दिग्दर्शित केला आहे. 2018 पासून सुरू असलेल्या या चित्रपटाचे बजेट तब्बल 300 कोटींच्या घरात गेले आहे.