मुंबईः गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या भावात चढ-उतार पाहायला मिळतायत. वाढते पेट्रोलचे दर सामान्यांसाठीसुद्धा डोकेदुखी ठरत आहेत. लोकल रेल्वे सर्व सामान्यांसाठी खुली नसल्यानं बऱ्याचदा नोकरदार कर्मचारी वाहनानं प्रवास करतात. त्यातच पेट्रोलचे वाढते दर त्यांची चिंता वाढवत आहेत. राज्यात पेट्रोलचे दर वाढले असून, नांदेड आणि परभणीमध्ये पेट्रोल सर्वाधिक महाग आहे. नांदेडमध्ये पेट्रोल प्रतिलिटर 95.26 रुपये आहे, तर परभणीत पेट्रोल प्रतिलिटर 95.05 रुपये आहे. दुसरीकडे सर्वाधिक महाग डिझेल औरंगाबाद, नांदेड आणि परभणीत आहे. नांदेडमध्ये डिझेल प्रतिलिटर 84.37 रुपये प्रतिलिटर आहे. तर परभणीत डिझेल प्रतिलिटर 84.15 रुपये प्रतिलिटर आहे.
अकोला 93.25 81.98
अमरावती 93.88 83.36
औरंगाबाद 93.64 84.54
भंडारा 93.74 82.92
बीड 93.27 82.45
बुलढाणा 93.07 82.27
चंद्रपूर 93.37 82.57
धुळे 93.44 82.62
गडचिरोली 93.44 82.64
गोंदिया 93.75 82.92
ग्रेटर मुंबई 92.92 83.35
हिंगोली 94.19 83.35
जळगाव 94.26 83.39
जालना 94.36 83.48
कोल्हापूर 92.68 81.89
लातूर 93.96 83.12
मुंबई 92.86 83.30
नागपूर 93.04 82.25
नांदेड 95.26 84.37
नंदूरबार 93.45 82.62
नाशिक 92.76 81.95
परभणी 95.05 84.15
पुणे 92.73 81.92
सकाळी सहा वाजता जाहीर होतात पेट्रोल-डिझेलचे दर
दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे सुधारित दर जाहीर केले जातात. सकाळी सहा वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत संबंधित शहरात नमदू केलेल्या दराप्रमाणे पेट्रोल-डिझेलची विक्री होते. पेट्रोल-डिझेलच्या मूळ किंमतीमध्ये अबकारी कर, डिलर्स कमिशन आणि अन्य गोष्टींचा समावेश झाल्यानंतर ही किंमत जवळपास दुप्पट होते. पेट्रोल आणि डिझेलचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींवर अवलंबून असतात.
तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कसे पाहाल?
मोबाईलवर एसएमएस पाठवून आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांची माहिती मिळू शकते. यासाठी मोबाईलवर RSP आणि आपल्या शहराचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा. त्यानंतर तुम्हाला लगेचच पेट्रोल-डिझेलच्या दरांची माहिती देणारा एसएमएस येतो. प्रत्येक शहराचा कोड वेगळा असतो. इंडियन ऑईलच्या (IOC) संकेतस्थळावरून हा कोड तुम्हाला उपलब्ध होईल.