यावल (रविंद्र आढाळे) – तालुक्यातील किनगाव बु येथील एका कांदा खरेदी करून खोटे धनादेश देवुन उत्पादक शेतकऱ्याची लाखो रुपयात फसवणुक करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
मिळालेल्या माहीतीनुसार छगन प्रमोद चौधरी वय५२ वर्ष शेतकरी ,राहणार किनगाव बु यांच्याकडुन किनगाव खुर्द येथील जय मातादी ट्रेडर्स किनगावचे संचालक संदीप सुधाकर कोळी , आणी घनःश्याम सुधाकर कोळी यांनी सन् २०२०च्या फेब्रुवारी ते मार्च २०२०या कालावधीत चौधरी यांच्या शेतात उत्पादीत केलेले ३६टन कांदे किमत ६ लाख११ हजार २५९चे विकत घेवुन त्यापैक्की २लाख५२ हजार रुपये रोख देवुन उर्वरीत रक्कम ३ लाख६३ हजार२३९ रूपये त्याचे पैसे न देता तिन धनादेश स्वरूपात स्टेट बँक ऑफ इंडीया चे दिले मात्र संबधीतांच्या खात्यात रक्कम नसल्याने तिघ धनादेश बाऊंस झालेत , धनादेश अनादर झाल्याबाबत संशयीत आरोपींना विचारणा केली असता त्यांनी आपणास जिवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद छगन प्रमोद चौधरी यांनी दाखल केल्याने त्यांच्या विरुद्ध भाग ५ गु .र .न.५२ / २०२१ भादवी कलम४२०, ५०६ , ३४प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे व पोलीस कर्मचारी करीत आहे .