रत्नागिरी –नागपूर या परिसरात येणाऱ्या व जागाऱ्या प्रवाशांची संख्या खुप आहे तसेच याठिकाणी पर्यटनस्थळ असल्याने मडगांच ते नागपुर रेल्वेसेवा लवकरच सुरु करण्यात यावा या मागणी करिता रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना वैभव बहुतुले यांनी पत्र दिले असून मडगांच ते नागपुर रेल्वे सेवा बुधवार,शुक्रवार,सोमवार सुरु करण्याच्या आग्रह ही केला.
रत्नागिरी जिल्ह्यातील स्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड, मंडणगढ, दापोली हे महत्वाचे ठिकाणा असून ही वेगाने विकसीत होणारी शहरे आहेत. दापोली येथे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाच्या रत्नगिरी व सिंधुदुर्ग परिसरात अनेक शाखा आहेत. कोकण कृषी विद्यापीठामध्ये नाशिक,धुळे जळगाव , बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर या परिसरातील अनेक नागरिक कार्यरत आहेत.
सिंधुदर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातून नाशिक, धुळे,जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती,वर्धा, नागपूर या परिसरात येणाऱ्या व जागाऱ्या प्रवाशांची संख्या खुप आहे. तसेच शेगाव येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत व विदर्भातील प्रसिध्द संत श्री. गजानन महाराज, नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आबेडकर यांची चैत्य भुमी, वर्धा येथील महात्मा गांधी यांचे सेवाग्राम,अमरावती शहरात संत गाडगेबाचा याचे स्मारक व नांदुरा येथील १०५ फुटी हनुमानाची मुर्ती दर्शनाकरिता व पाहण्याकरिता अनेक भाविक शेगांव व बुलागा परिसरात येत असतात.
धार्मीक तिर्थशेष, शैक्षणिक क्षेत्र, पर्यटन क्षेत्र, उद्योग क्षेत्र, पांची नाळ जोडल्यामुळे प्रचंड प्रमाणात प्रवाशांची या गाडीसाठी मागणी होत आहे. तसेच विदर्भ ते कोकण असे महाराष्ट्र दर्शन म्हणून या गाडीला सावंतवाडी रोड, कणकवली, राजापूर, रत्नगिरी, चिपळूण, खेड या थांब्यावरून नागपुर करिता जाणारी असंख्य प्रवाशी आहेत. या भाविकांना सिंधुदूर्ग य रत्नागिरी जिल्ह्यातून रेल्वे सेवा उपलब्ध नसल्याने द्राविडी प्राणायाम करावा लागत आहे. तरी या मेल्वेच्या प्रवाशांची आग्रही मागणी आहे की, मडगांव ते नागपूर रेल्वे सेवा बुधवार, शुक्रवार, सोमवार सुरु करण्यात यावी अशी मागणीचा पत्र देण्यात आला.