भडगांव- यशस्विनी सामाजिक जनजागृती अभियान समन्वयिका योजना पाटील यांनी हळदी कुंकू समारंभाचा कार्यक्रम जयहिंद कॉलनी भडगांव येथे आयोजित केला होता. पाचोरा येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षा गटनेत्या नगरसेविका सुचेता वाघ यांचे शुभहस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून प्रारंभ कण्यात आला.
पाचोरा तनिष्का व्यासपीठ तथा महिला संपर्क प्रमुख ज्योती वाघ,जळगांव जिल्हा महिला राष्ट्रवादी उपाध्यक्षा सुरेखा पाटील,जळगांव जिल्हा दूध संघ संचालिका डॉ.पूनम पाटील,शिवप्रेरणा प्रतिष्ठान अध्यक्षा मिना बाग,भडगांव राष्ट्रवादी शहराध्यक्षा रेखा पाटील,स्नेहशिल्प क्लब सदस्या माहेश्वरी देशमुख,पाचोरा महिला राष्ट्रवादी तालुकाध्यक्षा सरला पाटील,अड़व्होकेट संजिदा खान यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
तसेच उपस्थित सर्व मान्यवर महिलांचे हळदी कुंकू समारंभात स्वागत करून सन्मानित सन्मानित केले.तर सूत्रसंचालन वैशाली बाविस्कर व प्रास्ताविक,आभार आयोजक मा.सभापती नगरसेविका योजनापाटील यांनी मानले.