Monday, December 8, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

एकीच्या अंडाशयची गाठ फुटबॉलएवढी, तर दुसरीच्या दोन्ही अंडाशयांना गाठी !

"शावैम" मध्ये दोन्ही महिलांचे वाचले प्राण ; नातेवाईकांनी मानले आभार

by Divya Jalgaon Team
January 28, 2021
in आरोग्य, जळगाव, प्रशासन
0
एकीच्या अंडाशयची गाठ फुटबॉलएवढी, तर दुसरीच्या दोन्ही अंडाशयांना गाठी !

जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात स्त्री रोग व प्रसूती शास्त्र विभागात दोन महिलांच्या अंडाशयाच्या गाठीच्या यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात तज्ज्ञ डॉक्टरांना यश आले आहे. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले आहे.

चोपडा तालुक्यातील रामपूर येथील आदिवासी समाजाच्या शेतमजूर असलेल्या ४० वर्षीय महिलेच्या पोटात दुखत असल्याने सहा महिन्यांपूर्वी खाजगीत सोनोग्राफी करण्यात आली होती. त्यात पोटात अंडाशयाला गाठ असल्याचे दिसून आले होते. मात्र दारिद्रयाची परिस्थिती असल्याने त्यांना उपचार घेता येत नव्हते. अखेर सोमवारी दि. १८ जानेवारी रोजी त्यांनी उपजिल्हा रुग्णालय, चोपडा गाठले. तेथील डॉक्टरांनी तपासून जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठविले.

शासकीय रुग्णालयात आल्यावर स्त्रीरोग व प्रसूती शास्त्र तज्ज्ञ व विभाग प्रमुख डॉ. संजय बनसोडे यांनी महिलेची चिंताजनक झालेली प्रकृती पाहता शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी १९ रोजी सदर शेतमजूर महिलेची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेदरम्यान वैद्यकीय पथकाला चक्क अंडाशयाला असलेली फुटबॉलच्या आकाराएवढी मोठी गाठ काढण्यात यश आले. त्या गाठीचा
आकार ३०सेमी गुणिले २० सेमी ईतका होता.

गंभीर बाब अशी की, अंडाशयाच्या गाठीच्या देठ फिरल्याने चार वेळा पिळ बसलेला होता. त्यामुळे त्या गठित रक्तस्त्राव झाला होता.त्यामुळे सदर महिलेला असह्य वेदना होत होत्या. डॉ. संजय बनसोडे व त्यांच्या वैद्यकीय पथकाने शस्त्रक्रिया करून महिलेचा जीव वाचवल्याने तिच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले आहे.

तर दुसऱ्या घटनेत, धरणगाव शहरातील ३८ वर्षीय महिलेच्या तीन सीझर शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. या महिलेच्या पोटात देखील दुखत असल्याने वेदना जाणवत होत्या. गावाच्या आजूबाजूच्या खाजगी दवाखान्यांनी उपचारास नकार देत परत पाठवले होते. तसेच गुजरातमधील सुरत व धुळे येथील शासकीय रुग्णालयात देखील महिलेवर उपचार झाले नाही. पूर्वीच्या तीन सेझारियन शस्त्रक्रियेमुळे उपचारासाठी नकार येत होता.अखेर सोमवारी १८ जानेवारी रोजी महिलेच्या नातेवाईकांनी जळगावला आणत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या स्त्री रोग व प्रसूती शास्त्र विभागात उपचाराला आणले.

स्त्रीरोग व प्रसूती शास्त्र तज्ज्ञ डॉ. संजय बनसोडे यांनी महिलेची तपासणी केली असता, तिच्या दोन्ही अंडाशयाला गाठी असल्याचे निदान झाले. तसेच तीन सीझर असल्याने शस्त्रक्रिया करणे देखील अवघड होते. तरीही डॉ.संजय बनसोडे व वैद्यकीय पथकाने जोखीम पत्करत शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. मंगळवारी दि. १९ रोजी महिलेच्या दोन्ही अंडाशयातील पू काढून टाकत गाठी नष्ट करून वैद्यकीय पथकाने यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. नातेवाईकांनी डॉक्टरांचे आभार मानले आहेत.

या दोन्ही महिला रुग्णांची प्रकृती बरी होत असून गुरुवारी २८ रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शस्त्रक्रियेसाठी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्रीरोग व प्रसूती शास्त्र तज्ज्ञ व विभाग प्रमुख डॉ. संजय बनसोडे, डॉ. सोनाली मुपडे, डॉ. कांचन चव्हाण, भूलतज्ज्ञ डॉ.सचिन पाटील, डॉ. काजल साळुंखे, परिचारिका हेमलता जावळे ,सोनाली पाटील यांनी यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया केल्या. यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा नावलौकिक वाढला आहे.

Share post
Tags: JalgaonJalgaon newsMarathi Newsएकीच्या अंडाशयची गाठ फुटबॉलएवढीतर दुसरीच्या दोन्ही अंडाशयांना गाठी !
Previous Post

प्रजासत्ताक दिनानिमित्त जिवा सेनेतर्फे भारत माता पूजनाचा कार्यक्रम संपन्न

Next Post

माळी समाजातर्फे वर-वधू परिचय पुस्तिकेचे विमोचन

Next Post
माळी समाजातर्फे वर-वधू परिचय पुस्तिकेचे विमोचन

माळी समाजातर्फे वर-वधू परिचय पुस्तिकेचे विमोचन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group