जळगाव – अखिल भारतीय जिवा सेनेचे शहर अध्यक्ष उदय पवार यांनी 26 जानेवारी 2021 रोजी भारत माता पूजनाचा कार्यक्रम त्यांच्या यू डीज. प्रोफेशनल शॉप मोहाडी रोड येथे आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी समाज बांधवांसोबत इतर बांधव सुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी भारत मातेचे प्रतिमेचे पुजन केले.
यात नाभिक समाजाचे ज्येष्ठ श्रेष्ठ मा. भास्करराव पवार, जिवा सेनेचे जिल्हा अध्यक्ष देविदास फुलपगारे , जिल्हा उपाध्यक्ष किशोर वाघ, जिल्हा निरीक्षक किरण नांद्रे, जिल्हा सह सचिव संजय सोनवणे, जिवा सेना शहर अध्यक्ष उदय पवार, सचिव विजय कुवर, सह उपाध्यक्ष राहुल नेरपगारे, तात्या फुलपगारे, गोपाल निकम, गणेश बोरनारे, कमलेश निकम, नाभिक महामंडळाचे रवींद्र नेरपगारे, भरत बेंडाळे, राष्ट्रवादीचे अभिषेक पाटील, किरण धनगर, मांगीलाल पारेख, जितेंद्र शिंदे, भरत वाघ, जितेंद्र बारी, किरण सोनवणे, सुभाष चौधरी, सोनवणे काका, अनिल सोनवणे, युवराज बोरसे आदी बांधव उपस्थित होते.