Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात दिवसभर ३२८ दिव्यांगांची तपासणी

by Divya Jalgaon Team
January 27, 2021
in आरोग्य, जळगाव, प्रशासन
0
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात दिवसभर ३२८ दिव्यांगांची तपासणी

जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दिव्यांग मंडळ येथे बुधवारी २७ जानेवारी रोजी सुमारे ३२८ लाभार्थ्यांनी उपस्थिती देऊन वैद्यकीय तपासणी करीत प्रमाणपत्र मिळण्याबाबतची कार्यवाही पूर्ण केली.

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दिव्यांग मंडळ अद्ययावत सुविधांसह कार्यान्वित झाले आहे. दिव्यांग मंडळ अंतर्गत दिव्यांग व्यक्तींना दर बुधवारी प्रमाणपत्र मिळण्याबाबतची कार्यवाही सुरु झाली. सकाळी ८ वाजेपासून नाव नोंदणी करण्यासाठी दिव्यांग बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थिती दिली होती. त्यांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी सकाळी ९ ते १ वाजेदरम्यान करण्यात आली. तपासणी मुख्य गेट नं. २ कडील अधिष्ठाता कार्यालयासमोरील दिव्यांग मंडळाच्या कार्यालयात झाली.

दिवसभरात अस्थिव्यंग २१६, दृष्टीदोष ५२, कान-घसा २५, मानसिक ३५ अशा विविध दिव्यांगत्व असलेल्या सुमारे ३२८ लाभार्थ्यांची तपासणी झाली. यावेळी दिव्यांग मंडळाचे अध्यक्ष डॉ. मारुती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार यांच्यासह तज्ज्ञ डॉ. प्रवीण पाटील, डॉ. नितीन विसपुते, डॉ. अजय सोनवणे, डॉ. गिरीश राणे, डॉ. पियुषकुमार टाक, डॉ. कांचन नारखेडे, डॉ.योगेश गांगुर्डे यांनी दिव्यांगांची तपासणी केली. कर्मचारी गोपाल सोलंकी, चेतन निकम, आरती दुसाने, दत्तात्रय पवार, वाल्मिक घुले, विश्वजीत चौधरी यांनी सहकार्य केले.

Share post
Tags: JalgaonMarathi Newsरुग्णालयात दिवसभर ३२८ दिव्यांगांची तपासणीशासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ऐतिहासिक बॉयलर मशीन !
Previous Post

परिवहन विभागाचा तालुकानिहाय मासिक दौरा जाहिर

Next Post

८६ वर्षीय गोदावरी पाटील यांच्यासह डॉ.उल्हास व डॉ. वर्षा पाटील यांनीही घेतली लस

Next Post
८६ वर्षीय गोदावरी पाटील यांच्यासह डॉ.उल्हास व डॉ. वर्षा पाटील यांनीही घेतली लस

८६ वर्षीय गोदावरी पाटील यांच्यासह डॉ.उल्हास व डॉ. वर्षा पाटील यांनीही घेतली लस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group