Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

नदीत बैल धुण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा बुडून मृत्यू

by Divya Jalgaon Team
January 27, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
माहेरून १ लाखासाठी विवाहीतेचा छळ

जळगाव प्रतिनिधी ।  तापी नदीत बैल धुण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा नदीत बुडून मृत्यू  झाल्याची घटना रविवारी २६ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी तालुका पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, सुपडू बळीराम चौधरी वय ५४ रा. पळसोद ता.जि.जळगाव हे शेतकरी असून त्यांच्याकडे  असलेल्या बैलांना धुण्यासाठी ते आज  मंगळवारी गावालगत असलेल्या तापी नदीवर गेले होते.  काठावरच कपडे व पायातील बुट काढले तसेच बैलांना धुण्यासाठी पाण्यात उतरले. बैल धूत असताना एक बैल सुपडू चौधरी यांना खोल पाण्यात घेऊन गेला. या ठिकाणावरून सुपडू चौधरी यांना परतता आले नाही व त्यांचा बुडून मृत्यू झाला. पळसोद गावातील युवराज वाघ हे यावेळी तापी नदीकाठावरुन जात असताना हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. यानंतर घटनेची माहिती संपूर्ण गावभर पसरली व संपूर्ण ग्रामस्थ घटनास्थळी एकत्र आले. गावातील पोलीस पाटलांनी घटनेबाबत तालुका पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह हा जिल्हा रूग्णालयात हलवण्यात आला.  याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत सुपडू चौधरी यांच्या पश्चात पत्नी मंजुबाई, मुलगा अनिल, दोन मुली, सून नातवंडे असा परिवार आहे.

Share post
Tags: Crime newsJalgaonनदीत बैल धुण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा बुडून मृत्यू
Previous Post

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, नेहरू युवा केंद्राच्यावतीने 21 रक्तदात्याने केले रक्तदान

Next Post

यावल पंचायत समितीत वरिष्ठ सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात

Next Post
यावल पंचायत समितीत वरिष्ठ सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात

यावल पंचायत समितीत वरिष्ठ सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group