Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

सोने – चांदी पुन्हा झाली स्वस्त; आजचे दर काय आहे ते जाणून घ्या

by Divya Jalgaon Team
January 27, 2021
in राज्य
0
मोठी बातमी! १ जून २०२१ नंतर हॉलमार्कशिवाय सोन्याचे दागिने विकता येणार नाही

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणुकीला जास्त प्राधान्य देत आहेत. जागतिक स्तरावर घडणाऱ्या घडामोडींचा सोन्याच्या किमतींवरही परिणाम दिसून येत आहे. अमेरिकेत झालेले सत्तांतर आणि कोरोना लसीकरणाच्या बातम्यांमुळे सोन्याच्या भावात चढ-उतार (Gold Silver Rate Today) पाहायला मिळतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर बदलत असलेल्या किमतींचा परिणाम स्थानिक बाजारांवरही दिसून येतो. तसेच डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत होत असल्याचा परिणामही सोन्याच्या दरांवर होत असतो. विशेष म्हणजे सोन्याचे दर स्थिर असले तरी चांदीच्या दरात प्रतिकिलो 200 रुपयांची घसरण झालीय.

मुंबईतील सोने चांदीचे दर

22 कॅरेट सोने : 48, 330 रुपये

24 कॅरेट सोने : 49, 330 रुपये

चांदीचे दर : 66500 रुपये (प्रतिकिलो)

पुणे सोने चांदीचे दर

22 कॅरेट सोने : 48, 330 रुपये

24 कॅरेट सोने : 49, 320 रुपये

चांदीचे दर : 66500 रुपये (प्रतिकिलो)

सोनं 10 ग्रॅम म्हणजे 1 तोळा हे कशा पद्धतीने ठरलं?

100 वर्षांपूर्वी म्हणजे 1919 साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली. लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला 4.9375 ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं. दशमान पद्धत आल्यानंतर सोन्याचा भाव ग्रॅमच्या स्वरूपात ठरवण्यात आला. 1 तोळा सोनं हे 10 ग्रॅमच्या दशमान पद्धतीत बसवणं सहजसोपं जातं. त्यामुळे 10 ग्रॅम म्हणजेच 1 तोळा सोनं ही पद्धत निश्चित केली गेली.

येत्या काळात सोने प्रतितोळा 63 हजारांपर्यंत पोहोचण्याची शक्यता

देशांतर्गत मार्केटमध्ये सोन्याचे दर हा प्रति दहा ग्रॅम 63 हजारांपर्यंत पोहोचू शकतो, असे काही अर्थतज्ज्ञांचे मत आहे. तसेच आर्थिक मंदीचा सामना करण्यासाठी जगभरातील मध्यवर्ती बँकांनी गेल्या काही दिवसांपूर्वी व्याजदर कमी केले होते. त्याशिवाय व्यवसायांना पाठिंबा देण्यासाठी मोदी सरकारकडून पॅकेजही जाहीर करण्यात आलेत. तसेच दर कपातीला 2019 च्या उत्तरार्धात सुरू झाल्याने अनेक गुंतवणूकदार सोन्याकडे आकर्षित झाले आहेत. यंदाच्या वर्षात देशांतर्गत सोन्याचे भाव हे कमीत कमी 60 हजारांपर्यंत पोहोचू शकतात, असा एक कयास बांधला जात आहे. तर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये याचा भाव हा 2200 डॉलर इतका होऊ शकतो. मात्र यासाठी रुपयामध्ये स्थिरता असणे गरजेचे आहे. मात्र जर रुपया डॉलरच्या तुलनेत घसरला तर याबाबतचा अंदाज पुढे-मागे होऊ शकतो.

Share post
Tags: #Gold-Silver RateMarathi NewsMumbaiसोने - चांदी पुन्हा झाली स्वस्त; आजचे दर काय आहे ते जाणून घ्या
Previous Post

दिल्लीत झालेल्या शेतकरी ट्रॅक्टर रॅलीत 86 पोलीस जखमी, 15 गुन्हे दाखल

Next Post

पेट्रोल – डिझेलच्या अचानक वाढ झालेले दर, जाणून घ्या

Next Post
आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घ्या

पेट्रोल - डिझेलच्या अचानक वाढ झालेले दर, जाणून घ्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group