नवी दिल्ली – प्रजासत्ताक दिनी शेतकर्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसेचे वळण लागले. या घटनेत 86 पोलीस कर्मचारी जखमी झाले असून 15 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी ही माहिती दिली आहे. तसेच लाल किल्ल्यातील सर्व आंदोलनकर्त्यांना बाहेर काढले असून तिथे अर्ध सैनिक बल तैनात करण्यात आले आहेत.
लाल किल्ला मेट्रो स्थानकात प्रवेश बंदी लागू करण्यात आली असून प्रवाशांना बाहेर पडण्याची मुभा देण्यात आली आहे. तर बाकी सर्व मेट्रो स्थानकं सुरु आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुकरबा चौक, गाझीपूर, सीमापुरी, नांगलोई टी पॉंइंट, टिकरी बॉर्डर आणि लाल किल्ला भागात झालेल्या हिंसेत 86 पोलीस कर्मचारी जखमी झाले अहेत. तसेच या हिंसेत 17 खासगी गाड्यांचे नुकसान झाले आहे. गाजीपूर, सिंघु आणि टिकरी बॉर्डरवर आंदोलनकर्त्यांनी पोलिसांचे बॅरीकेड्सही तोडले आहेत.