भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ येथे मॉडर्न रोडवर सेलिब्रेशन नावाचे कापड दुकानाला आज रात्रीच्या सुमारास शॉर्ट सर्कीटने लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाल्याची घटना घडली. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु आहे.
भुसावळातील राष्ट्रवादीचे काँग्रेस पार्टीचे माजी नगराध्यक्ष अख्तर पिंजारी यांचे लहान बंधू यांच्या सेलिब्रेशन मॉर्डन रोड वरील कापड दुकानाला मंगळवार दिनांक 26 रोजी बंद असल्याने दुकानाला अचानक रात्री 8.00 वाजेच्या सुमारास शॉकसर्किटमुळे आग लागल्याने अंदाजे 8 लाखाचे नुकसान झाले आहे.
घटनास्थळी अग्निशामक दलाचे कर्मचारी पोहचून आगेला नियंत्रणात आणण्यास यश आले आहे.घटनास्थळी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अर्चित चांडक, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत,सपोनि मंगेश गोटला तसेच कर्मचारी यांनी धाव घेतली.अधिकाऱ्यांनी झालेल्या घटनेची माहिती घेण्याचे काम सुरू होते.बाजारपेठ पोलीस स्टेशनला आग लागल्याबाबत गुन्हे दाखल करण्याची नोंद उशीरपर्यंत सुरु आहे.