नवी दिल्ली : देश आज 72 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशीही देशात पेट्रोल महागलेलं होते. तर, आज स लग दुसऱ्या दिवशीही पेट्रोल-डिझेलचे रेड वाढले आहेत. मंगळवारी पेट्रोलच्या दरात तब्बल 35 पैशांची वाढ झाली आहे. दिल्लीत पेट्रोलचे दर 35 पैशांनी वाढ आहेत, मुंबईत 34 पैसे, कोलकात्यात 34 पैसे आणि चेन्नईत 31 पैशांनी वाढले आहेत.
पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार, मंगळवारी दिल्लीत पेट्रोलचा दर 86.05 रुपये प्रति लीटर इतका असेल. तर मुंबईत 92.62 रुपये प्रति लीटर असेल. तर कोलकात्यात पेट्रोलचा दर 87.45 रुपये प्रति लीटर असेल. तर दिल्लीत डिझेलचा दर 76.23 रुपये प्रति लीटर असेल. तर मुंबईत 83.03 रुपये प्रति लीटरने डिझेल विकलं जाईल. जाणून घ्या तुमच्या शहरातील दर.
देशाच्या मुख्य शहरांमधील पेट्रोलचे दर
दिल्ली : 86.05 रुपये प्रति लीटर
मुंबई : 92.62 रुपये प्रति लीटर
कोलकाता : 87.45 रुपये प्रति लीटर
चेन्नई : 88.60 रुपये प्रति लीटर
नोएडा : 85.48 रुपये प्रति लीटर
मुख्य शहरांमधील डिझेलचे दर
दिल्ली : 76.23 रुपये प्रति लीटर
मुंबई : 83.03 रुपये प्रति लीटर
कोलकाता : 79.83 रुपये प्रति लीटर
चेन्नई : 81.47 रुपये प्रति लीटर
नोएडा : 76.68 रुपये प्रति लीटर
महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील पेट्रोलचे आजचे दर
शहरं आजचे भाव कालचे भाव
अकोला 92.65 92.49
अमरावती 93.33 93.49
औरंगाबाद 92.50 93.49
भंडारा 92.64 92.96
बीड 93.60 93.60
बुलढाणा 92.64 92.91
चंद्रपूर 92.63 92.25
धुळे 92.68 92.51
गडचिरोली 93.86 93.28
गोंदिया 93.17 93.43
ग्रेटर मुंबई 92.32 92.34
हिंगोली 93.61 93.71
जळगाव 93.22 92.44
जालना 93.54 93.70
कोल्हापूर 92.58 92.57
लातूर 93.74 93.26
मुंबई 92.28 92.28
नागपूर 92.30 92.24
नांदेड 94.92 94.42
नंदूरबार 93.27 92.15
नाशिक 92.72 92.04
परभणी 94.74 94.61
पुणे 92.14 92.70
पेट्रोलचे दर आवाक्याबाहेर जाण्याचं कारण काय?
राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दराने उच्चांकी गाठली आहे. मुंबईत पेट्रोलचे दर 90 च्या पार गेली आहे. तर डिझेलचे दर हे 80 रुपयांच्या पार गेले आहेत. मात्र, प्रक्रिया केल्यानंतर पेट्रोल पंपावर पेट्रोलचा मूळ दर हा 28.50 रुपये प्रति लीटर असते. तर डिझेलचा मूळ दर हा 29.52 रुपये प्रति लीटर असते. मात्र, केंद्र आणि राज्य सरकारकडून आकारण्यात येणाऱ्या करांमुळे पेट्रोल-डिझेलचे दर आवाक्याबाहेर गेले आहेत. सरकार पेट्रोल आणि डिझेलवर त्याच्या मुळ किमतीच्या दुप्पटीपेक्षा जास्त कर आकारते.
पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
सकाळी सहा वाजता जाहीर होतात पेट्रोल-डिझेलचे दर
दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे सुधारित दर जाहीर केले जातात. सकाळी सहा वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत संबंधित शहरात नमदू केलेल्या दराप्रमाणे पेट्रोल-डिझेलची विक्री होते. पेट्रोल-डिझेलच्या मूळ किंमतीमध्ये अबकारी कर, डिलर्स कमिशन आणि अन्य गोष्टींचा समावेश झाल्यानंतर ही किंमत जवळपास दुप्पट होते. पेट्रोल आणि डिझेलचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींवर अवलंबून असतात.
तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कसे पाहाल?
मोबाईलवर एसएमएस पाठवून आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांची माहिती मिळू शकते. यासाठी मोबाईलवर RSP आणि आपल्या शहराचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा. त्यानंतर तुम्हाला लगेचच पेट्रोल-डिझेलच्या दरांची माहिती देणारा एसएमएस येतो. प्रत्येक शहराचा कोड वेगळा असतो. इंडियन ऑईलच्या (IOC) संकेतस्थळावरून हा कोड तुम्हाला उपलब्ध होईल.
आणखी वाचा
सोने-चांदीच्या दरात चढ-उतार; जाणून घ्या आजचा भाव