मुंबई – एकनाथराव खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर गृहनिर्माण खाते मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात याबाबत नुकतीच बैठक पार पडली असून असून थोड्याच वेळात याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेण्याआधी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यात आज दुपारी अत्यंत महत्त्वाची बैठक झाली. यशवंतराव चव्हाण सभागृहात ही बैठक झाली असून त्यात जितेंद्र आव्हाड यांना राजीनामा देण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे.
याचाच अर्थ असा की, जितेंद्र आव्हाड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला लावून त्यांना प्रदेशाध्यक्ष करण्याच्या हालचाली आता पक्षात सुरू झालेल्या आहे तर पक्षांमध्ये नव्यानेच प्रवेश घेणाऱ्या एकनाथराव खडसे यांना गृहनिर्माण खाते मिळू शकते.