वारजे, : समाजाला शहाणे करून सोडण्यासाठी साहित्य संमेलन होणे गरजेचे आहे. याबरोबर माणसाने आपला अहंकार सोडला पाहिजे नाहीतर आपली अधोगती होते. असे मत डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी वारजे येथे केले.
वि. दा. पिंगळे लिखित चौकट कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा प्रसंगी डॉ. पाटील बोलत होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले म्हणाले वाचन जो पर्यंत वाढत नाही. तोपर्यंत समाज पुढे जाऊ शकत नाही. यामुळेच आपण इतर देशाच्या मागे आहोत. त्यासाठी राजकारणी लोकांनीही साहित्य व संस्कृती जोपसली पाहिजे. यावेळी प्रास्ताविकात वि. दा. पिंगळे यांनी पुस्तके ही माणसाला जागवायला शिकवितात. त्यासाठी पुस्तकावर प्रेम करायला शिकले पाहिजे. यावेळी डॉ.डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, नगरसेवक दिलीप बराटे, लेखक वि. दा. पिगळे, माजी शिक्षण मंडळ अध्यक्ष बाबा धुमाळ, सायली वांजळे, राजन लाखे, अनिल गुंजाळ, शैलेश त्रिभुवन, युवराज माळी, कल्पेश शहा व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत पंडीत यांनी केले तर आभार मयुरेश पोटे यांनी केले.