Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

अमेझॉन प्राईम वरील तांडव वेबसिरीजमध्ये हिन्दु देवदेवतांचा अपमान

हिन्दु जनजागृती समितीने केली बंदीची मागणी

by Divya Jalgaon Team
January 23, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव, राजकीय
0
अमेझॉन प्राईम वरील तांडव वेबसिरीजमध्ये हिन्दु देवदेवतांचा अपमान

yawal photo

यावल- (रवींद्र आढळे) – हिन्दु देवदेवतांचा अवमान करून हिन्दुंच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या आणी जातीयद्वेष पसरवणाऱ्या तांडव वेबसिरीजवर तात्काळ बंदी आणुन सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी हिन्दु जनजागृती समितीच्या वतीने केन्द्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कडे एका निवेदनाव्दारे केली आहे.

दरम्यान आज यावल येथील निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार यांना दिलेल्या निवेदनात हिन्दु जनजागृती समिती दिलेल्या आपल्या निवेदनात म्हटले आहे की, अमेझॉन प्राईम वर चित्रपट अभिनेता सैफ अली खान ,अभीनेत्री डिपंल कपाडीया, मोहम्मद जिशान अय्युब आणी गौहर खान यांची भुमीका असलेली तसेच अली अब्बास जफर दिग्दर्शित ही वेबसिरीज नुकतीच प्रसारीत झाली आहे.

या वेबसिरीजमध्ये कोटयवधी हिन्दूंचे आराध्यदैवत भगवान शिव आणी भगवान श्रीराम यांच्या विषयी आक्षेपार्ह संवाद दाखवुन त्यांचा अवमान करण्यात आला आहे. तसेच भारताचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या प्रमाणे व्यक्तिरेखा दाखवुन त्यांचाही अपमान केलेला आहे.तसेच जेएनयु मधील देशद्राही घोषणा देणाऱ्या कन्हैयाकुमार आणी तत्सम देश विरोधी घटकांचे उदात्तीकरणही करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे दिसुन येत आले आहे. याची काही उदारणे पुढे देत निवेदनात म्हटले आहे की , या वेबसिरीजच्या एका प्रसंगामध्ये भगवान शिवाची भुमीका करणारे मोहम्मद जिशान अय्युब म्हणतातआखिर आपको किससे आजादीचाहीए ?त्यावर एक कलाकार म्हणतो … नारायण नारायण प्रभु कुछ किजिए.

रामजी के फॉलोअर्स लगातार सोशल मिडीया पर बढते ही जा रहे है. या वेबसिरीज मध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन दाखवण्यात आले असुन पंतप्रधानाच्या मुलाच्या सांगण्यावरून आंदोलनातील तिन मुस्लमान युवकांचा एन्काऊंटर करण्यासाठी पोलीसांना सांगीतले जाते. यापैक्की दोन मुसलमान युवकांना पोलीस ठार करतात यातुन वर्तमान सत्ताधारी पक्षही मुसलमांनाची हत्या घडवत असल्याचा संदेश देण्यात प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच यातील तिसरा मुसलमान युवक उमर खालीदयाच्या प्रमाणे व्यक्तीरेखा असलेला दाखवला असुन तो आंदोलन स्थळावरून विवेकानंद विश्वविद्यालयात ( व्हीएनयु ) जातो. त्याला आंतकवादी असल्याचे सांगत पोलीस उचलुन घेवुन जातात.

या प्रसंगात व्हीएनयु हे जेएनयुप्रमाणे दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्व प्रकारातुन जेएनयु मध्ये झालेल्या देशद्रोही कृत्यांचे एका प्रकारे समर्थन करत देशद्रोही विद्यार्थ्यावर कसा अन्याय केला गेला हे दर्शवण्याचा प्रयत्न केला गेला आहे असा विद्वेषीतांडव वेबसिरीजवर तात्काळ बंदी आणावी ,तसेच त्यातील सर्व दोषींवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी केली असुन या निवेदनावर हिन्दु जनजागृती समितीचे धिरज सुभाष भोळे, प्रशांत जुवेकर , चेतन भोईटे , हेमंत बडगुजर , चंदु बडगुजर , शिवाजी रामदास बारी , धनराज कोळी , लखननाथ यांच्या स्वाक्षरी आहेत .

Share post
Tags: अमेझॉन प्राईमनिवासी नायब तहसीलदार आर.के.पवारहिन्दु देवदेवतांचा अपमान
Previous Post

त्या’ मुख्याध्यापकांचे निवेदन दबावात

Next Post

आजचे राशीभविष्य, शनिवार, २३ जानेवारी २०२१

Next Post
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, शनिवार, २३ जानेवारी २०२१

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group