जळगाव – मविप्र संस्थेचे मानद सचिव निलेश भोईटे यांनी सन 2018 पासून पदोन्नतीचे दिलेले प्रस्तावास आपल्या कार्यालयाने मान्यता आजतागायत दिलेली आहे. आम्ही मुख्याध्यापक देखील याच संचालक मंडळाचे आदेश मानत आलोय…
आमच्या संस्थेत कार्यालय देखील एकच आहे तिथून निलेश भोईटे यांचे संचालक मंडळ कारभार सुरळीत सुरु असून संस्थेने केलेल्या बदल्या व पदोन्नती प्रस्तावास तात्काळ मान्यता प्रदान करण्यात यावे या मागणीसाठी मविप्र संस्थेच्या सर्व 28 मुख्याध्यापकांनी शिक्षणाधिकारी यांना दि.19 रोजी निवेदन दिले आहे.
या निवेदनावरून शिक्षकांमध्ये असलेली नोकरी जाण्याची दहशत किती आहे याचा प्रत्यय येतो. नोकरीवरून कमी करण्यासह अन्य मार्गाने मुख्याध्यपकांसह शिक्षकांना त्रास होऊ शकतो हे टाळण्यासाठी निवेदन काढल्याचे बोलले जात आहे. प्रत्येक मुख्याध्यपकांवर निवेदन काढण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचे मुख्याध्यपकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
मविप्र संस्थेतील संचालक मंडळाच्या वादात शिक्षकांचा बळी जात असल्याची वस्तुस्थिती आहे. शिक्षणाधिका-यांना दिलेले निवेदन आणि त्यानंतर मुख्याध्यापकांमधील असंतोष पाहता मविप्र संस्थेत सर्व काही आलबेल नसुन पत्रकवार, एकमेकांविरूध्द अर्जफाटे दिसुन येतात यामुळे संस्थेसह शिक्षकांचे नुकसान आहे.