यावल (रविंद्र आढाळे) – तालुक्यातील सावखेडा सिम येथील एका शेत मजुराने गाव शिवारातील विहीरीत उडी घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली असुन पोलीसात अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे .
यावल तालुक्यातील सावखेडा सिम येथील राहणारे अनिल धुडकु पाटील यांनी सावखेडा सिम शिवारातील अजय दिलीप पाटील यांच्या शेतातील खोल विहीरीत उडी मारून पाण्यात बुडुन आत्महत्या केल्याची घटना घडली असुन मयत व्यक्ति अनिल पाटील वय४५ वर्ष हे दि. १९ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजेपासुन कुणालाही काही न सांगता घरातुन निघुन गेले होते तसेच विविध ठिकाणी शोध घेतल्यावर पतीचा तपास लागला नाही म्हणुन त्यांची पत्नी प्रतिभा पाटील यांनी त्यांचे मोठे भाऊ शंकर धुडकु पाटील वय ४८ वर्ष राहणार रायपुर जळगाव यांना दुरध्वनीवरून सदरची माहीती कळविल्याने ममताचे मोठे भाऊ यांनी परीसरात पुनश्च शोध घेतले असता अनिल पाटील यांचे मृतदेह हे अजय पाटील यांच्या शेतातील विहीरीत आढळुन आले.
याबाबत मयताचे मोठे भाऊ शंकर धुडकु पाटील यांनी खबर दिल्याने अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली असुन , पुढील तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी मेहबुब् तडवी हे करीत आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन यावल येथील ग्रामीण रुग्णालयात डॉ .बी .बी .बारेला यांनी केले. मयत अनिल पाटील यांनी आत्महत्या का केली याचे कारण मात्र अद्याप ही समजु शकले नाही .