यावल (रविंद्र आढाळे) – येथील शहरातील बोरावल गेट परिसरात अल्पवयीन मुलीचे लग्न लावुन दिल्याप्रकरणी विवाह लावणाऱ्या काझी सह इतरांविरूद्ध बालविवाह प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन , या घटनेमुळेचा गुन्हा दाखल झाल्याने एकच चर्चेचा विषय बनला आहे .
दरम्यान या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की यावल शहरातील बोरावल गेट परिसरात राहणारे राजु पटेल , जरीना राजु पटेल राहणार कंडारी पोस्ट साकरे तालुका धरणगाव आणी विवाह लावणारे हाजी समद पटेल राहणार बोरावल गेट तसेच शाहरूख राजु पटेल मुलाचे वडील व आई नांव माहीत नाही या सर्वांनी मिळुन अल्पवयीन आरजु पटेल हिचा विवाह (निकाह ) मुस्लीम धार्मीक रितीरिवाजा प्रमाणे लावुन दिल्याचे उघडकीस आल्याचे जिल्हा बालसंरक्षण सचिव तथा जिल्हा महीला व बालविकास अधिकारी विजयसिंग ई . परदेशी यांच्याकडील कार्यालयास दिनांक ११ / १ / २०२० रोजी प्राप्त पत्रासोबत जोडलेल्या पत्रांचे अवलोकन करता व या घटनेतील पिडीत अल्पवयीन आरजु शाहरूख पटेल वय १५ वर्ष३ महीने असुन,
तिचा जबाब चोपडा शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक अजीत सावळे यांनी दिनांक १९ / १२ / २०२० रोजी यावल येथील शाहरूख राजु पटेल यांचा जबाब नोंदविल्याने हे निष्पन्न झाले असुन , आरजु शाहरूख पटेल हि अल्पवयीन असतांना तिचे वडील राजु पटेल व आई जरीना राजु पटेल यांनी बालविवाह प्रतिबंध अधिनियम२००६चे पोट कलम१व३ अन्वये सौ . अर्चना राजेन्द्र आटोळे वय४oवर्ष यावल बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी यावल पोलीसात तक्रार दाखल दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला असुन , घटनेचा पुढील तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी संजय तायडे हे करीत आहे .