यावल (रविंद्र आढाळे) – संपुर्ण जगासह आपल्या देशात कोरोना विषाणु संसर्गाच्या वाढत्या प्रार्दुभावाच्या संकटकाळात नागरीकांना प्रत्येक दिवसाची माहीती वुन खऱ्या अर्थाने आरोग्याच्या दृष्टीकोणातुन आपले स्वता:चे जिव धोक्यात घालुन वृत्तसंकलनाच्या माध्यमातुन जनजागृतीचे कार्यकरणाऱ्या पत्रकारांचा राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजीत सत्कार सोहळा आज यावल येथे संपन्न झाला.
यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजीत करण्यात आलेल्या या पत्रकारांच्या सत्कार सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष अॅड . रवीन्द्र भैय्या पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्ष रोहीणीताई खडसे खेवलकर , राष्ट्रवादी महीला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष सौ . कल्पनाताई पाटील , यावल नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतुल पाटील , माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक राकेश मुरलीधर कोलते , राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस विजय प्रेमचंद पाटील , गिरधर काशीनाथ पाटील यांच्यासह आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते .दरम्यान कार्यक्रमात यावल तालुका प्रतिनिधी अय्युब पटेल यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला . कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रा . मुकेश येवले व युवक राष्ट्रवादीचे अॅड . देवकांत पाटील यांनी केले .


