जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा एकता मराठा फाउंडेशनतर्फे २० ते २४ जानेवारी दरम्यान शिवतीर्थ मैदानावर जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जळगाव जिल्हा एकता मराठा फाउंडेशनतर्फे आजपासून शिवतीर्थ मैदानावर जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
एकता मराठा फाउंडेशनतर्फे २० ते २४ जानेवारी दरम्यान शिवतीर्थ मैदानावर जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचा समारोप आमदार रोहित पवार यांच्या उपस्थित होणार असल्याची माहिती कार्याध्यक्ष गोपाल दर्जी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हा एकता मराठा फाउंडेशनतर्फे बुधवारी सायंकाळी ६.३० वाजता क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन होणार आहे. यात जिल्हाभरातून २० संघ सहभाग नोंदवणार आहे. डे व नाईट या प्रकारांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. समारोप प्रसंगी आमदार रोहित पवार उपस्थित राहणार आहे. त्यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरणसह पन्नासहून अधिक दिव्यांगांना पाचोरा येथील डॉ. भूषण मगर यांच्यातर्फे व्हीलचेअरचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती सुध्दा याप्रसंगी देण्यात आली.