Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

खंडणी मागणारे तीन तोतया पत्रकार अटकेत

by Divya Jalgaon Team
January 19, 2021
in गुन्हे वार्ता, राज्य
0
महामार्गावरून दुचाकीस्वाराला उडविणार्‍या कंटेनर चालक ताब्यात

पुणे (प्रतिनिधी) – ‘स्पा सेंटर सुरू ठेवायचा असेल, तर दरमहा 15 हजार रुपये हप्ता द्यावा लागेल’ असे सांगत खंडणी घेणाऱ्या तीन तोतया पत्रकारांना जेरबंद करण्यात आले आहे. ही कारवाई कोरेगाव पार्क परिसरात करण्यात आली.

विशाल कचरू पायाळ (28, रा. कदमवाक वस्ती), सनी तानाजी ताकपेरे (27 , रा. घोरपडे वस्ती), पंकेश राजू जाधव (35 रा. कोंढवा खुर्द) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत.

तक्रारदार मंगेश डोंगरखोस हे स्काइन स्पा सेंटर येथे मॅनेजर आहेत. सेंटरच्या मालक नूतन धवन (रा. केशवनगर, मुंढवा) या आहेत. विशाल पायाळ हा एका वृत्तपत्राचा पत्रकार असल्याचे सांगत आहे. दि.16 जानेवारी रोजी तो साथीदारासह स्पा सेंटरला आहे. तेथे त्याने ‘माझ्या परवानगीशिवाय स्पा सुरू ठेवता येणार नाही. तुम्हाला दरमहा 15 हजार रुपये द्यावेच लागतील. अन्यथा त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल,’ असे सांगत दांडके बाळगणारी माणसे पाठवून मारहाण करण्याची धमकी दिली.

सोमवारी त्याने फोन करुन ‘दुपारी पैसे घेण्यासाठी येतो,’ असे सांगितले. त्यामुळे स्पा मालक यांनी कोरेगाव पार्क पोलिसांकडे तक्रार केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांनी इतर अधिकारी, पंचांना बोलावून स्पा सेंटर येथे सापळा रचला. विशाल पायाळ व सनी ताकपेरे तेथे आले असता, मॅनेजरकडून 15 हजार रुपयांचा हप्ता घेताना पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडले.

दोघांकडे ओळखपत्रे सापडली …

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघेही एका वृत्तपत्रात काम करत असल्याचे सांगतात. त्यांच्यापैकी दोघांकडे ओळखपत्रे सापडली आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. ते मागील काही दिवस कोरेगाव पार्कमधील प्रत्येक स्पा सेंटरमध्ये जाऊन महिना 15 हजार रुपयांची मागणी करत होते.

Share post
Tags: CausedcrimeDummy JournalistPolice CustodyPuneखंडणी मागणारे तीन तोतया पत्रकार अटकेत
Previous Post

जिल्ह्यात आज ३२ रूग्ण कोरोनाबाधित आढळले

Next Post

तालुक्यातील वावडदा परिसरात शेतपंप्पाची केबल चोरी

Next Post
तालुक्यातील वावडदा परिसरात शेतपंप्पाची केबल चोरी

तालुक्यातील वावडदा परिसरात शेतपंप्पाची केबल चोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group