नवी दिल्ली : मंगळवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX Gold Price) सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण झाली आहे. आज सकाळी फेब्रुवारीसाठीच्या सोन्याच्या वायदे किंमतीत 18 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. या घसरणीनंतर दर 48,876 रुपये प्रति तोळा या स्तरावर पोहोचले होते. चांदीच्या फ्यूचर ट्रेडिंगमध्ये 356 रुपयांची वाढ झाली आहे. या तेजीनंतर भाव 65,785 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. याआधीच्या सत्रात सोन्याचे दर (Gold price today) 48,215 रुपये प्रति तोळा होते. तर चांदी (Silver Price Today) 64,116 रुपये प्रति किलोग्रॅमवर होती.
दिल्लीमध्ये या दराने सुरू झाला व्यवहार
22 कॅरेट गोल्ड – 47660 रुपये प्रति तोळा
24 कॅरेट गोल्ड – 51990 रुपये प्रति तोळा
चांदीचे दर – 65600 रुपये प्रति किलो
आंतरराष्ट्रीय बाजारात काय आहे परिस्थिती?
याशिवाय आज जर आंतरराष्ट्रीय बाजाराबाबत (International Market) बोलायचं झालं तर याठिकाणी तेजी पाहायला मिळाली. अमेरिकेत सोन्याचे दर 1.95 डॉलरच्या तेजीनंतर 1,838.33 डॉलर प्रति औंसवर आहेत. तर चांदीमध्ये याठिकामी 0.25 डॉलर्सची तेजी आली आहे. यानंतर चांदीचे भाव 25.21 डॉलर आहेत.
सोमवारी देशातील बाजारात काय होते दर?
भारतीय बाजारात सोमवारी अर्थात 18 जानेवारी 2021 रोजी सोन्याचे दर (Gold Price on 18th January 2021) 117 रुपयांनी वाढले होते. यानंतर दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे भाव प्रति तोळा 48,332 रुपये होते. तर चांदीमध्ये (Silver Price on 18th January 2021) 541 रुपयांच्या वाढीनंतर दर 64,657 रुपये प्रति किलोग्रॅम झाले होते.