गुजरात, वृत्तसंस्था – गुजरातमधील सुरतमध्ये एक भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. कीम रोडवर डंपरने रस्त्यालगतच्या फुटपाथवर झोपलेल्या १८ लोकांना चिरडले आहे. ज्यामधील १३ लोकांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेले सर्व मजूर असून ते राजस्थानमध्ये राहणारे आहेत. सध्या जखमींना लोकांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच १३ जणांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
यामुळे घडला हा भीषण अपघात?
मध्यरात्री १२च्या सुमारास सुरतमधील किम-मांडवी रोडवर एका डंपरने रस्त्यालगत असलेल्या फुटपाथ झोपलेल्या १८ मजुरांना चिरडले. माहितीनुसार, भरधाव वेगाने जात असलेल्या हा डंपर चालक ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळेस उसाने भरलेल्या ट्रॅक्टरला डंपर चालकाने टक्कर मारली. टक्कर मारल्यामुळे डंपर चालकाचे स्टेअरिंग व्हिलवरील नियंत्रण सुटले आणि डंपर फुटपाथवर झोपलेल्या मजुरांवर पलटी झाला. यामध्ये फुटपाथवर झोपलेल्या १३ जणांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान सहा वर्षांच्या एका मुलीचा अपघातात चमत्कारीकरित्या जीव वाचला आहे. पण तिच्या आई-वडिलांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेले राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्यातील कुशलगढ येथील मूळ रहिवाशी होते. सध्या घटनास्थळी पोलिस पोहोचले असून मृतदेहांना ताब्यात घेऊन शवविच्छेनासाठी पाठवण्यात आले आहे.
Gujarat: 13 people died after they were run over by a truck in Kosamba, Surat.
Police says, “All the deceased are labourers and they hail from Rajasthan.” pic.twitter.com/E9uwZnrgeO
— ANI (@ANI) January 19, 2021