जळगाव प्रतिनिधी । महापौर भारती सोनवणे यांनी आजपासून महास्वच्छता अभियानाला सुरूवात केली. मात्र शिवाजीनगरातील नागरीकांनी महापौर व आयुक्तांना घेराव घालून स्वच्छतेबाबत जाब विचारला. महास्वच्छता अभियानासाठी आज शिवाजी नगर भागात स्वच्छता केली आहे, एरवी स्वच्छता होत नाही असा आरोप स्थानिक रहिवाश्यांनी केला आहे.
दरम्यान, शहरात अनेक ठिकाणी घाणीचे ढीग साचले असून काही ठिकाणी अस्वच्छता वाढली असल्याच्या तक्रारी महापौरांकडे प्राप्त होत होत्या. संपूर्ण शहर स्वच्छ करण्यासाठी महापौर भारती सोनवणे यांनी आजपासून तीन दिवस विशेष महास्वच्छता अभियान हाती घेतले. शिवाजी नगरात अमृत योजना आणि भूमिगत गटारींचे काम सुरू असून चाऱ्या योग्यप्रकारे दुरुस्त न केल्याने रस्त्याची दुरावस्था होत आहे. रस्त्यांमुळे साफसफाई होत नसल्याने नागरिकांची ओरड होत आहे.
शहरात अमृत योजना आणि भूमिगत गटारींचे काम सुरू असून चाऱ्या योग्यप्रकारे दुरुस्त न केल्याने रस्त्याची दुरावस्था होत आहे. रस्त्यांमुळे साफसफाई होत नसल्याने नागरिकांची ओरड होत असून काम केलेल्या सर्व प्रभागातील चाऱ्या तातडीने बुजवून रस्त्यांची डागडुजी करावी अशा सूचना महापौरांनी मक्तेदाराच्या प्रतिनिधींना दिल्या. प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांना महास्वच्छता अभियान बाबत माहिती देण्यात आलेली आहे. आपापल्या प्रभागातील तक्रारीबाबत नागरिकांनी महास्वछता अभियानादरम्यान महापौरांकडे तक्रार करावी, असे आवाहन महापौरांनी केले आहे.