जळगाव – क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगांव द्वारा आयोजित युवा दिन युवा सप्ताह दि. १२ ते १९ जानेवारी हा साजरा करण्यात येणार आहे.त्या निमित्ताने दि. १४ जानेवारी रोजी जळगाव जिल्हा हौशी योग असोसिएशनच्या सहकार्याने सूर्यनमस्कार स्पर्धा ऑनलाइन लाईव्ह घेण्यात आल्या असून कोरोनाच्या कारणामुळे कोणतेही खेळ व त्यांच्या स्पर्धा कार्यक्रम झाले नाहीत परंतु कोरोनाचा अडथळा पार करून ऑनलाइन लाईव्ह योगाच्या स्पर्धांचे अखंडित व सातत्यपूर्ण आयोजन डॉक्टर अनिता पाटील यांनी केले.
सर्व जग बंद असेल तरीही सूर्यनमस्काराच्या स्पर्धा ह्या ऑनलाईन लाईव्ह घेऊन शरीर व मन निरोगी राहण्यासाठी युवा पिढीला निरोगी राहण्याचा संदेश या सूर्यनमस्काराच्या स्पर्धांमधून देण्यात आला .
या प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांनी योग व सूर्यनमस्काराचे महत्त्व समजावून सांगितले. आंतरराष्ट्रीय योग पंच व मार्गदर्शक डॉक्टर अनिता पाटील यांनी सूर्यनमस्कार म्हणजे सूर्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी असून आजचा दाता हा सूर्यच आहे हा एक बारा आसनांचा क्रम व शरीर व मनाला एकत्र आणतो अशी माहिती दिली.
क्रिडा अधिकारी सुजाता चव्हाण यांनी दोन गटात होणा-या ऑनलाइन लाइव्ह सूर्य नमस्कार स्पर्धेबाबत मार्गदर्शन केले तर पंच म्हणून रुद्राणी देवरे अर्चना महाजन व ज्योती भांडारकर यांनी कार्य केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुमनांजली बहुद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सुमन रहाणे, इंटरनॅशनल नॅचरोपॅथी; जळगाव जिल्ह्याच्या सचिव अर्चना महाजन, एम .एस .ई. बी उपकार्यकारी अभियंता जळगाव ग्रामीणचे सतीश पाटील, जळगाव जिल्हा असोसिएशनचे सचिव डॉक्टर अनिता पाटील यांनी दीपप्रज्वलन व स्वामी विवेकानंद यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात केली.कार्यक्रमाची तांत्रिक जबाबदारी सुशील तळवेलकर यांनी केली.
विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे
15 ते 20 वयोगट मुली :-
1.चेतना नितीन देवरे :- प्रथम
2.पूर्वा जयंत महाजन :- द्वितीय
3.गौरी बागुल :- तृतीय
15 ते 20 वयोगट मुलं :-
1.जय प्रवीण पाटील :- प्रथम
2.सागर देशमुख :- द्वितीय
3.पार्थ पाटील :- तृतीय
21 ते 29 वयोगट युवती :-
1.निकिता चौधरी :- प्रथम
2.नम्रता चौधरी :- द्वितीय
21 ते 29 वयोगट युवक :-
1.प्रसाद भाऊसाहेब पाटील :- प्रथम