जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील इच्छादेवी परीसरातील तांबापुर भागामधील पंचशील नगरातील एका घरातून २२ हजार किंमतीचे दोन मोबाईल लंपास केल्याची घटना १६ रोजी शनिवारी सकाळी घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्थानकातून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील इच्छादेवी परीसरातील तांबापुर भागामधील पंचशील नगरात राहणारे रूक्साना राजू तडवी (वय-२८) रा.वडगाव ता. रावेर या शिक्षण घेतात. त्या नातेवाईकांसोबत राहतात. १५ जानेवारी रोजी रात्री १० वाजता जेवण करून सर्वजण झोपले. मध्यारात्री अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा लोटून १५ हजार रूपये किंमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल आणि न्याजोद्दिन तडवी यांचा ७ हजार रूपये किंमतीचा मोबाईल असा एकुण २२ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाला अज्ञात चोरट्यांनी लांबविला. दोन मोबाईल चोरी झाल्याचे शनिवारी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आला.
याप्रकरणी रूक्साना तडवी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक चेतन सोनवणे करीत आहे.


